कोरोना व्हायरसच्या लक्षणांमध्ये आणखी एका नवीन लक्षणाची भर पडली आहे. कोरोना व्हायरसच्या लक्षणांमुळे तुमच्या मनात संभ्रमाचं वातावरण तयार झालं असेल. कारण दर काही दिवसांनंतर कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर रुग्णांमध्ये नवीन लक्षणं समोर येत आहेत. अशावेळी घाबरण्यापेक्षा प्रॅक्टिकल विचार करायला हवा. कारण मानसिक स्थिती बिघडल्यानंतर कोणत्याही आजारातून बाहेर येणं कठीण असतं. पण तेच तुम्ही जर मानसिकदृष्या बळकट असाल तर कोणत्याही आजारावर मात करून आजारातून बाहेर येऊ शकता.
कोविड 19 आणि फ्लू या आजारांच्या लक्षणांमध्ये फारसा फरक नाही. सुरूवातील कोरोना व्हायरसची लक्षणं सामान्य ताप, सर्दीप्रमाणेच असतात. नंतर श्वास घ्यायला त्रास होतो. कोरोना व्हायरसच्या इतर लक्षणांवर लक्ष दिल्यास तुम्हाला दिसून येई की सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणं, चव न समजणं अशा लक्षणांचे प्रमाण सर्वाधिक रुग्णांमध्ये आहे. कोरोना व्हायरसच्या नवीन लक्षणांमध्ये तोंडाला रॅशेज येणं या लक्षणाचा समावेश आहे. अशी माहिती स्पेनच्या तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांना तोंडात चट्टे पडण्याची समस्या उद्भवत आहे.
माऊथ रॅशेजच्या समस्येला वैद्यकिय परिभाषेत एनाथंम असं म्हणतात. हा अभ्यास १५ जुलैला जामा डर्मेटॉलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यात नमुद केलेल्या माहितीनुसार कोरोनाचे जितके रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्या रुग्णांमधील २१ रुग्णांना स्किन रॅशेजच्या समस्येचा सामना कराव लागला आहे. त्यातील ६ रुग्णांना तोंडाला चट्टे पडण्याची समस्या उद्भवली होती.
न्यूयॉर्कमधील लेनॉक्स हिल हॉस्पिटलच्या डर्मेटॉलजिस्ट डॉक्टर माइकल ग्रीन यांनी दिलेल्या माहितीनुसार या आजारात लहान लहान डाग पडतात. म्यूकस मेंमरेंनवर व्हायरसचे आक्रमण केल्यामुळे लाल आणि सफेद डाग पडतात. व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये, कांजण्या झालेल्या रुग्णांमध्ये अशी लक्षणं दिसून येतात. कोरोनाचं संक्रमण झालेल्या रुग्णांमध्ये हे लक्षणं नवीनच आहे. जास्तीत जास्त रुग्णांच्या ओरल हेल्थ आणि माऊथ कॅव्हिटीजवर नकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
फक्त शरीरालाच नाही तर मेंदूलाही नुकसान पोहोचवू शकतात तुमच्या 'या' चुकीच्या सवयी
धोका वाढला! कोरोनापेक्षाही महाभयंकर विषाणू पसरण्याचा धोका; तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' कारण