CoronaVirus News : भयावह! भारतात सापडला कोरोनाचा नवा 'AP स्ट्रेन'; आधीच्या वेरिएंटपेक्षा १५ टक्के जास्त संक्रामक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 04:07 PM2021-05-04T16:07:36+5:302021-05-04T16:15:17+5:30
CoronaVirus News & Latest Updates : सेंटर फॉर सेल्यूअर एँट मॉलिक्यूलर बायोलॉजी (CCMB)च्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा वेरिएंट १५ टक्के जास्त संक्रामक आहे.
भारतात कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन पुन्हा एकदा समोर आला आहे. या स्ट्रेनचं नाव एपी स्ट्रेन असून आंध्र प्रदेशात या स्ट्रेननं संक्रमित रुग्ण सापडले आहेत. वैज्ञानिक भाषेत या स्ट्रेनला N440K वैरिएंट असं म्हटलं जात आहे. सेंटर फॉर सेल्यूअर एँट मॉलिक्यूलर बायोलॉजी (CCMB)च्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा वेरिएंट १५ टक्के जास्त संक्रामक आहे. या स्ट्रेनमुळे फक्त ३ ते ४ दिवसात लोक गंभीर आजारी पडत आहेत. एपी स्ट्रेन म्हणजेच N440K वैरिएंट सगळ्यात आधी आंध्र प्रदेशातील कुरनूलमध्ये आढळला. हा नवीन स्ट्रेन आधी आढळलेल्या B1.617 आणि B1.618 पेक्षा जास्त शक्तीशाली आहे.
Lineages with #N440K are NOT the dominant ones in the second wave of #Covid19inIndia. While N440K was a indeed mutation of concern in South India during and after the first wave, current data shows that it is essentially replaced by new VoCs such as #B1617 and #B117pic.twitter.com/3mbjLNijny
— Divya Tej Sowpati (@TejSowpati) May 3, 2021
विशाखापट्टणमचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर वी. विनय चंद यांनी सांगितले की, ''CCMB मध्ये या नवीन स्ट्रेनवर परिक्षण केले जात आहे. या नवीन स्ट्रेनचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. व्हायरसचा हा स्ट्रेन लवकर विकसित होत आहे. याचा इनक्यूबेशन पिरीयड आणि आजार पसरवण्याची कालावधी कमी आहे. खूप कमी वेळात हा व्हायरल जास्ती जास्त लोकांना संक्रमित करत आहे. या स्ट्रेननं ३ ते ४ दिवसात लोकांना गंभीर स्थितीत पोहोचवलं आहे.'' अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार
भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे अनेक केसेस समोर आल्या त्यात SARS-CoV-2 हा वेरिएंट दिसून आला. सध्या दोन नवीन म्यूटेंट वेरिएंट मिळाले आहेत. त्यांचे नाव E484Q आणि L452R आहे. हे स्ट्रेन युकेच्या स्ट्रेनशी संबंधीत आहेत. डिसेंबर २०२० पासून महाराष्ट्रात या संबंधित केसेस अधिकाधिक वाढत असून याबाबत या अभ्यासात उल्लेख करण्यात आला आहे. या स्ट्रेनमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होत आहे. २० टक्के प्रकरणांमध्ये व्हायरस म्यूटेंट झाला असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा