वाढत्या कोरोनाच्या प्रसारात अमेरिकेनं दिली खुशखबर; ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत लस मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 12:34 PM2020-09-11T12:34:28+5:302020-09-11T13:22:16+5:30

CoronaVirus News & latest Updates : अमेरिकन फार्मा कंपनी फायजरची लस ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापर्यंत उपलब्ध होऊ शकते.

CoronaVirus News : Pfizer vaccine biontech vaccine update covid vaccine in us | वाढत्या कोरोनाच्या प्रसारात अमेरिकेनं दिली खुशखबर; ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत लस मिळणार 

वाढत्या कोरोनाच्या प्रसारात अमेरिकेनं दिली खुशखबर; ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत लस मिळणार 

googlenewsNext

जीवघेण्या कोरोनाशी  संपूर्ण देश लढत आहे.  कोणतीही लस तयार करणं ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. कोरोना विषाणूंच्या संक्रमणापासून बचावासाठी रशियानं स्पुतनिक वी ही लस तयार केली असून सामान्य लोकांसाठी बाजारातसुद्धा आणली आहे. दरम्यान कोरोना लसीबाबत अमेरिकेत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. अमेरिकन फार्मा कंपनी फायजरची लस ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापर्यंत उपलब्ध होऊ शकते. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे सीईओ आणि सहसंस्थापक उगुरसहिन यांनी स्थानिक  वृत्त वाहिनीशी बोलताना ही माहीती दिली आहे. फायजरची लस ऑक्टोबर महिन्यापर्यंत येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ही लस अमेरिकन कंपनी फायजर आणि जर्मन कंपनी बायोएनटेकने मिळून तयार केली आहे. रिपोट्सनुसार बायोएनटेकच्या तज्ज्ञांनी  या लसीवर विश्वास दाखवत सांगितले की, ''आमच्याकडे एक सुरक्षित लस तयार आहे. ही लस कोरोना विषाणूंच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी प्रभावी ठरेल. लस घेत असलेल्या स्वयंसेवकांना ताप आल्याची लक्षणं दिसून आली आहेत. याशिवाय डोकेदुखी,  अंगदुखी, थकवा येण्याच्या समस्येचा सामना करावा लागला आहे.''

या लसीचे तिसया टप्प्यातील चाचणीला सुरूवात झाली आहे.  जुलै महिन्यात फायजर आणि बायोएनटेक या दोन कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही लस मानवी परिक्षणातील शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. आता हे परिक्षण सफल ठरल्यास ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापर्यंत लस उपलब्ध होऊ शकते.  त्यानंतर सरकारच्या परवानगीसाठी निवेदन देण्यात येणार आहे.  कंपनीनीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष 2020 च्या शेवटापर्यंत लसीचे 10 कोटी आणि 2021 च्या शेवटापर्यंत लसीचे  1.3 अब्ज डोस तयार केले जातील. अमेरिकेतील सरकारनं फायजरसोबत 10 कोटी डोस खरेदी करण्यासाठी  करार केली आहे.  या करारानुसार गरज पडल्यास लसीचे 50 कोटी डोज तयार करण्यास सांगितले जाणार आहे. 

फायर्स फार्मामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार फायजर आणि बायोएनटेक कंपनीच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, कोरोना व्हायरसची ही लस  अमेरिकन सरकारला 19.50 डॉलर प्रति डोज म्हणजेच 1500 रुपये प्रति डोज विकली  जाणार आहे. यासाठी त्यांना 40 डॉलर म्हणजचे  3 हजार रुपये देण्याची आवश्यकता भासू शकते. दरम्यान लसीकरणास सुरूवात झाल्यास लसीची किंमत जवळपास  1 हजार 500  रुपयांपर्यंत असू शकते. 

मे महिन्यापर्यंत तब्बल 64 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग; ICMRचा धक्कादायक खुलासा

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच ICMR ने केलेल्या पहिल्या राष्ट्रीय सीरो सर्वेक्षणांचा निकाल समोर आला आहेत. यामधून कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला, 0.73% प्रौढ म्हणजेच तब्बल 64 लाख (64,68,388) लोक कोरोना व्हायरसच्या संपर्कामध्ये होते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार, प्रत्येक RT-PCR चाचणीत एक पॉझिटिव्ह प्रकरण समोर येत होतं. त्यावेळी 82-130 अशी संक्रमणाची प्रकरणं समोर होती.

कोरोनाची जेव्हा देशभर लॉकडाऊन सुरू होता तेव्हा कोरोनाची अशी अवस्था होती. सीरो सर्वेक्षणातून ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची एकही प्रकरण समोर आलं नाही. त्या जिल्ह्यांमध्येही कोरोनाचा संसर्ग पसरल्याचं समोर आलं आहे. कोरोनाचा धोका वाढत आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही किंवा कमी रुग्ण आढळले अशा ठिकाणी कोरोना चाचण्याच कमी प्रमाणात झाल्या असाव्यात. चाचण्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे.

जेणेकरून रुग्णांबाबत माहिती मिळणं सोपं होतं. तसेच काही ठिकाणी लॅब वाढण्याची गरज असल्याचंही यामध्ये म्हटलं आहे. ग्रामीण भागात सेरो पॉझिटिव्हिटीचं प्रमाण सर्वाधिक म्हणजे 69.4 टक्के होतं तर शहरी झोपडपट्ट्यांमध्ये ते 15.9 टक्के आणि शहरी नसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये 14.6 टक्के नोंदवलं गेलं आहे. 18-45 वर्षे (43.3) वयोगटात सीरो पॉझिटिव्हिटी सर्वाधिक असून 46-60 वर्षे (39.5) आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील सर्वांत कमी सेरो पॉझिटिव्हिटी आहे.

हे पण वाचा-

लढ्याला यश! चीनने तयार केली नेझल स्प्रेद्वारे दिली जाणारी कोरोना लस; नोव्हेंबरपासून चाचणीला सुरूवात

हाताने नाकावरचे पिंपल्स फोडणं चांगलंच अंगाशी आलं; मेंदूत झालं गंभीर इन्फेक्शन अन् मग...

Web Title: CoronaVirus News : Pfizer vaccine biontech vaccine update covid vaccine in us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.