रशियाच्या ज्या युनिव्हर्सिटीने सगळ्यात आधी कोरोनाची लस तयार करण्याचा दावा केला आहे ती लस ऑगस्टपर्यंत लोकांपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लहान पातळीवर करण्यात आलेल्या मानवी परिक्षणात ही लस यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. मॉस्कोच्या सेचेनोव यूनिव्हर्सिटीने (Sechenov First Moscow State Medical University) ३८ स्वयंसेवकांवर मानवी परिक्षण पूर्ण केले आहे. रूसमधील तज्ज्ञांनीही सरकारी गमलेई नॅशनल रिसर्च सेंटरमधील रिसर्च पूर्ण केले आहेत.
वृत्तसंस्था TASS ने दिलेल्या माहितीनुसार १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान ही लस 'सिविल सर्कुलेशन' मध्ये असेल. खासगी कंपन्यांनी सप्टेंबरमध्ये या लसीचे उत्पादन मोठया प्रमाणावर करण्याची माहिती दिली आहे. गमलेई सेंटरच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीची मानवी चाचणी पूर्णपणे सुरक्षित झाली होती. आता ऑगस्टमध्ये रुग्णांना ही लस दिल्यानंतर तिसरा टप्पा सुरू होईल. आधी ज्यांना ही लस देण्यात आली आहे. त्या लोकांवर लक्ष दिले जाईल.
साधारणपणे सुरक्षिततेची पडताळणी करून तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण सुरू होईल. या इंस्टीट्यूटने १८ जूनला ट्रायल सुरू केले. ९ स्वयंसेवकांना एक डोज देण्यात आला. इतर ९ जणांच्या ग्रुपला बुस्टर डोस देण्यात आला. कोणावरही लसीचे साईडईफेक्ट्स दिसून आले नाही. म्हणून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सेचेनोव यूनिवर्सिटीमधील दोन ग्रुप्सना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. २३ जूनला डोज दिल्यानंतर त्यांना २८ दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये राहायला सांगण्यात आलं आहे.
१८ ते ६५ या वयोगटातील स्वयंसेवकांना ६ महिन्यांपर्यंत निरिक्षणाखाली ठेवलं जाणार आहे.रशियातील तज्ज्ञ आता सामान्य लोकांना लस देण्याच्या तयारीत आहेत कारण त्यांना कोरोनाच्या टेस्टिंगमध्ये त्यांना सगळ्यात पुढे जायचे आहे. अमेरिका, ब्राजील, भारतापेक्षा जास्त रुग्ण त्या ठिकाणी आहेत. रशियाचे सरकार आणि तज्ज्ञ ५० पेक्षा जास्त वेगवेगळ्या लसींवर काम करत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रोटोकॉलनुसार मोठया प्रमाणात लसीचा प्रयोग करण्याआधी पहिल्या तीन टप्प्यातील रिसर्च योग्य होणं गरजेचं आहे. आतापर्यंत लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही लसीला मान्यता दिलेली नाही. अशा स्थितीत रशियातील तज्ज्ञांना वेगाने लसीचा तिसरा टप्पा सुद्धा यशस्वीरित्या पार करायचा आहे.
खरचं चीनने जाणीवपूर्वक कोरोना विषाणू पसरवला?; WHO ची टीम सत्य समोर आणणार
काळजी वाढली! खरंच लस दिल्याने कोरोनापासून बचाव होईल? तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा