गेल्या काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसने जगभरातील अनेक देशामध्ये हाहाकार निर्माण केला आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं होतं. लॉकडाऊन दोन महिन्यांनी उठवल्यानंतर पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे परत लॉकडाऊन करण्याची वेळ आली. परिणामी लोक आपापल्या घरी बसून आहेत. पण काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या अभ्यानुसार जे लोक सर्वाधिकवेळ घरी राहत आहेत. त्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे.
अमेरिकेतील तज्ज्ञांनी सेंटर फॉर डिजीज कंट्रोल आणि प्रिवेंशनमध्ये एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार ५ हजार ७०६ रुग्णांवर संशोधन करण्यात आले होते. हे लोक कोरोना व्हायरसने प्रभावित होते. या रुग्णाांच्या संपर्कात असलेल्या अन्य काही लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. या संशोधनातून दिसून आलं की यातील फक्त २ टक्के लोक घराबाहेरील कोरोना व्हायरसच्या संपर्कात आले आहेत. १० पैकी एक व्यक्ती हा घरात राहूनच व्हायरसने संक्रमित झाला होता. संक्रमित लोकांमध्ये वयोवृद्ध आणि लहान मुलांचा समावेश होता.
या रिपोर्टमध्ये दक्षिण कोरिया माहामारी नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ. जियाँग उन क्याँग यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार लहान मुलं आणि वयस्कर लोकांचा कुटुंबातील इतर लोकांशी जवळचा संबंध असल्यामुळे अशी स्थिती उद्भवते. तसंच लहान मुलांमध्ये संक्रमणाची तीव्रता कमी असते. असंही या संशोधनात स्पष्ट करण्यात आलं.
दरम्यान कोविड १९ मधून बरं झाल्यानंतर रुग्णांना फुफ्फुसांची समस्या उद्भवत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. फाइब्रॉयसिस (fibrosis) या आजारात लंग्स टिश्यू डॅमेज होतात. म्हणजेच फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. परिणामी श्वास घ्यायला त्रास होतो. कोरोनातून बाहेर आल्यानंतरही अशा रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टची आवश्यकता असते. याशिवाय हृदयासंबंधी समस्या जास्त प्रमाणात उद्भवतात.
अनेक रुग्णांमध्ये हृदयाच्या पेशींना सुज येण्याचं प्रमाण वाढलं आहे. वैद्यकिय परिभाषेत या समस्येला मायोकाइडार्टिस (myocarditis) म्हणतात. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनातून बरं झाल्यानंतर उद्भवत असलेल्या आजारांपासून बचावासाठी चांगल्या, आनंदमय वातावरणात राहणं गरजेचं आहे.
व्हिटामीन्समुळे कमी होत आहे 'या' देशातील कोरोना विषाणूंचे संक्रमण; तज्ज्ञांनी सांगितले मागचं कारण
भय इथले संपत नाही! देशात कोरोनापेक्षाही घातक आजाराचा शिरकाव; 'या' शहरात आढळला रुग्ण