CoronaVirus Precautions : कोणता मास्क डबल लावण्याची गरज असते? कोणता नाही; संसर्गापासून लांब राहण्याचा सोपा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 04:13 PM2021-05-03T16:13:45+5:302021-05-03T16:22:49+5:30
CoronaVirus Precautions : कोरोनापासून बचावासाठी साधारणपणे तीन प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत.
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं भारतासह संपुर्ण जगभरात कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची नावं आणि रुग्णांचा वाढता आकडा समोर येत आहे. अशा स्थिती कोरोनापासून बचावासाठी अनेक तज्ज्ञांनी डबल मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. डबल मास्क का वापरायचा? कोणता मास्क डबल वापरायची आवश्यकत असते. याबाबत सीडीसी म्हणजेच अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीस कंट्रोल एंड प्रिवेंशनने गाईडलाईन्स दिल्या आहेत.
कोरोनापासून बचावासाठी साधारणपणे तीन प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. पहिला म्हणजे एन ९५ मास्क. योग्य पद्धतीनं वापर केला तर हा मास्क ९५ टक्के सुरक्षा प्रदान करू शकतो. सर्जिकल मास्क कोरोनापासून बचावासाठी ५६ टक्के सुरक्षा प्रधान करतो. तर कापडाचा मास्क फक्त ५१ टक्के सुरक्षा प्रदान करतो. सीडीसीनं दिलेल्या माहितीनुसार कोरोनापासून बचावासाठी एन ९५ मास्कचा वापर करायला हवा.
With the rise in the SARS_CoV_2 variants, @CDCgov has brought out guidelines for double masking to enhance performance of masks. My humble attempt at capturing them in a poster. pic.twitter.com/fyxwmGVrMA
— Samatha Mathew (She/her)🗯️ (@Samatha_Mathew) May 2, 2021
जर एन ९५ मास्कचा वापर तुम्ही करत असाल तर डबल मास्क वापरण्याची गरज भासणार नाही. पण जर तुम्ही सर्जिकल किंवा कापडाचा मास्क वापरत असाल तर डबल मास्क घालावाच लागेल. सर्जिकला मास्क वापरत असाल तर तो आतल्या बाजूनं कपड्याच्या मास्कनं कव्हर असायला हवं.
कोरोनाच्या जीवघेण्या लाटांपासून अखेर कधी मिळणार सुटका?; समोर आली दिलासादायक माहिती...
सीडीसीने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार २ सर्जिकल मास्क किंवा कापडाचे मास्क वापरणं टाळा. यामुळे कोणताही फायदा होणार नाही. श्वास घ्यायला त्रास होईल. एन ९५ मास्क तुमच्या तोंडाला व्यवस्थित बसेल तसंच सुरक्षाही प्रदान करेल. तुलनेनं सर्जिकला मास्कची फिटिंग एव्हढी चांगली नसते. थोडावेळ वापरल्यानंतर तो लूज पडतो. कापडाचा मास्क ३ लेअर्सचा असेल तर ७७ टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळू शकतं.
कितीवेळा वापरता येऊ शकतो एक मास्क?
एन ९५ मास्क तुम्ही जास्तीत जास्त पाचवेळा वापरू शकता. सर्जिकल मास्क एकदा वापल्यानंतर फेकून द्यायला हवा. कापडचा मास्क वापरत असल्यास धुवून तुम्ही पुन्हा त्याचा वापर करू शकता. घाणेरडा मास्क वापरू नका, मास्कवर सॅनिटायजर किंवा कोणतंही केमिकल टाकू नका. CoronaVaccine : संक्रमण होतंच मग कोरोनाची लस का घ्यायची? तज्ज्ञांनी सांगितला लस घेण्याचा सगळ्यात मोठा फायदा