चिंताजनक! कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आल्यानंतरही रुग्णांना जाणवतेय 'ही' नवी समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 12:13 PM2020-07-06T12:13:47+5:302020-07-06T12:16:55+5:30

CoronaVirus : याआधी करण्यात आलेल्या संशोधनातून  कोरोनातून बाहेर आलेल्या रुग्णांना डायबिटीससारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो अशी माहिती समोर आली होती. 

CoronaVirus : Some covid patients wont recover senses of smell study finds | चिंताजनक! कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आल्यानंतरही रुग्णांना जाणवतेय 'ही' नवी समस्या

चिंताजनक! कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आल्यानंतरही रुग्णांना जाणवतेय 'ही' नवी समस्या

Next

कोरोनाच्या संक्रमणामुळे जगभरात हाहाकार निर्माण झाला आहे. कोरोनाच्या माहामारीला आटोक्यात आणण्यासाठी लस आणि औषधांसाठी विविध देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.  सध्या संशोधनातून नवीन माहिती समोर आली आहे. याआधी करण्यात आलेल्या संशोधनात  कोरोनातून बाहेर आलेल्या रुग्णांना डायबिटीससारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो अशी माहिती समोर आली होती. 

जगभरातील लोक मोठ्या संख्येने कोरोना संक्रमित होत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या माहामारी विरुद्ध लढताना अनेकांच्या आरोग्याचं नुकसान झालं आहे.  कोरोनाचं संक्रमण झाल्यामुळे अनेकजणांना वास घेण्यासाठी त्रासाचा सामना करावा लागत आहे. पॅरिसमधील जीन मिशेल मैलार्ड यांनी सांगितले की कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आल्यानंतर मला कोणत्याही प्रकारचा वास जाणवत नाही. या स्थितीला एनोस्मिया असं म्हणतात. म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या संवेदना नाकाला न जाणवणे. कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर येत असलेल्या लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो.

पीडितांची मदत करण्यासाठी फ्रांसीसी समुहाचे anosmie.org चे अध्यक्ष मेलार्ड यांनी सांगितले की, एनोस्मियामुळे तुमच्या शरीरातील वास घेण्याची किंवा नाकाला संवेदना जाणवण्याची  क्षमता कमी होते. त्यामुळे  सकाळचा चहा, इतर अन्य खाद्यपदार्थ किंवा सुगंधीत वस्तूंचा वास जाणवत नाही. पॅरिसमधील एका रुग्णालयातील कान, नाक आणि गळ्याचे तज्ज्ञ एलन कॉरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पूर्णपणे वेगळा अनुभव आहे. ताटात जेवण वाढल्यानंतर चव चांगली असल्यास किंवा सुगंध आल्यास तुम्ही या जेवणाची प्रशंसा करता. पण एनोस्मियामुळे तुम्ही असं करू शकत नाही.

राइनाइटिस, मधुमेह, अल्जाइमर, पार्किंसंस या आजारात सुद्धा एनोस्मियाची समस्या उद्भवते. आता कोविड19 चे नाव सुद्धा या आजारांना जोडले जाईल. जेव्हा वास घेण्याची क्षमता कमी होते तेव्हा संक्रमणातून बाहेर आल्यानंतरही ही समस्या कमी होईल की नाही. याबाबत शंका असते. विशेष म्हणजे या  स्थितीवर कोणतेही औषध उपलब्ध झालेलं नाही. सध्या कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगचा वापर केला जात आहे. लस किंवा औषध तयार करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांचे संशोधन सुरू आहे. 

जीवाशी खेळ! कोरोना संक्रमित होण्यासाठी 30 हजार लोकांची तयारी...

काळजी वाढली! 'ही' समस्या असलेल्यांना दुसऱ्यांदा होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण

Web Title: CoronaVirus : Some covid patients wont recover senses of smell study finds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.