कोरोनाची लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. ब्रिटेन, अमेरिका, चीन आणि रशिया लसीच्या परिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. जोपर्यंत कोरोनाची लस विकसित होत नाही तोपर्यंत गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात आहे. साइंस एडवांसेज जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या रिपोर्टनुसार बीसीजी लसीने कमीत कमी पहिल्या ३० दिवसात पसरत असलेल्या कोरोना संक्रमणाचा वेग कमी करू शकतो.
अमेरिकन एसोसिएशन फॉर द एडवांसमेंट ऑफ साइंसने दिलेल्या माहितीनुसार बीसीजी लसीकरण अशा ठिकाणी अनिवार्य आहे. ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसच्या प्रसारच्या पहिल्या तीस दिवसातील संक्रमण आणि मृत्यूदर जास्त आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार २९ मार्च मध्ये अमेरिकेत कोरोना व्हायरसने २ हजार ४०० लोकांचा मृत्यू झाला असून जर बीसीजी लसीकरण केले असते तर हा आकडा ५०० पेक्षा कमी असता. संशोधकांनी हे विश्लेषण १३४ देशांमधील माहितीच्या आधारे केले होते.
भारत आणि चीनमध्ये बीसीजीचे राष्ट्रीय लसीकरण अभियान सुरुवातीपासून आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळेच कोरोनाचा मृत्यूदर या देशांमध्ये कमी आहे. बीसीजी लसीमुळे कोरोना विषाणूंशी निगडीत असलेल्या समस्यांपासून बचाव करण्याासाठी मदत होते. बीसीजीची लस जन्मल्यानंतर १५ दिवसांच्या आत लहान मुलांना दिली जाते. त्यामुळे संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. भारतातही कोरोना रुग्णांवर बीसीजी लसीचे क्लिनिकल ट्रायल सुरू केले आहे. याअंतर्गत २५० रुग्णांना बीसीजी लस देण्यात येणर आहे. याचे परिणाम दिसून येण्यासाठी २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, निरोगी रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढत होत आहे. गेल्या २४ तासांत ५२ हजार ९७२ रुग्णांची नोंद झाली तर, ७७१ रुग्णांचा मृत्यू झाला. सलग दुसऱ्या दिवशी एकाच दिवसात ५० हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८ लाख ०३ हजार ६९६ झाली आहे. यातील ५ लाख ७९ हजार ३५७ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर ३८ हजार १३५ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
चिंताजनक! आता कोरोना विषाणू दीर्घकाळ पाठ सोडणार नाही; WHO ची धोक्याची सुचना
पावसाळ्यात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन; रोगप्रतिकारकशक्ती होईल कमी, वेळीच सावध व्हा