कोरोनाबाधित असलेल्या सगळ्याच लोकांमध्ये समान लक्षणं असतील असं अजिबात नाही. कोरोनाच्या लक्षणांवर संक्रमणाची गंभीरता अवलंबून असते. कोरोनातून रिकव्हर झालेल्या लोकांना संक्रमण 'लॉन्ग कोविड' च्या समस्येचा सामना करावा लागत आहे, म्हणजेच कोरोनातून रिकव्हर झालेल्या लोकांमध्ये काही आठवढ्यांनी किंवा महिन्यांनी लक्षणं दिसून येत आहेत. कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका गंभीर आजार असलेले लोक, वयस्कर लोक, अस्थमा, लठ्ठपणा यांसारख्या समस्या असलेल्या लोकांना जास्त असतो. याव्यतिरिक्त ज्या लोकांमध्ये कोरोना व्हायरसची पाचपेक्षा अधिक लक्षणं दिसून येतात त्यांना लॉन्ग कोविडचा धोका जास्त असतो. किंग्स कॉलेज लंडनमध्ये झालेल्या एका संशोधनातून संशोधकांनी हा दावा केला आहे.
किंग्स कॉलेज लंडनच्या एका रिसर्चनुसार २० पैकी एक व्यक्ती आठ आढवड्यापेक्षा जास्तकाळ आजारी होता. या अभ्यासात नमुद करण्यात आले होते की, लक्षणं नसलेल्या किंवा सौम्य लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये संक्रमणानंतर लक्षणं दिसून आली असून ही लक्षणं अनेक महिन्यांपर्यंत दिसत होती. या समस्येला लॉन्ग कोविड असं म्हणतात. किंग्स कॉलेज लंडनमध्ये करण्यात आलेल्या या संशोधनातून दिसून आलं की, कोरोना संक्रमणाच्या आधीच्या आठवड्यात पाचपेक्षा अधिक लक्षणं होती. त्यामुळे लॉन्ग कोविडचा धोका जास्त उद्भवला.
ब्रिटन आणि स्वीडनमधील जवळपास ४ हजार रुग्णांवर परिक्षण करण्यात आले होते. या अभ्यासानुसार चारपैकी एका कोरोना रुग्णांमध्ये साईड इफेक्ट्स दिसून आले होते. न्युरोलॉजिकल प्रभावामुळे हे साईड इफेक्ट्स दिसून आले होते. मागच्या आठवड्यात ब्रिटेनमध्ये झालेल्या एका संशोधनातून दिसून आलं की, लॉन्ग कोविडच्या समस्येबाबत व्यक्तीचे वय, श्वसनसंस्था, लिंग आणि वजन याद्वारे माहिती मिळवता येऊ शकते.
धूळ, प्रदूषणामुळे येणारा खोकला की कोरोनाचं संक्रमण? असा ओळखा या दोघांमधील फरक
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी केलेल्या एका शोधानुसार कोरोनातून रिकव्हर झालेल्या रुग्णांमध्ये अनेक महिन्यांपर्यंत कोरोना व्हायरसचा परिणाम दिसून आला होता. लॉन्ग कोविडचा सामना करत असलेल्यांमध्ये थकवा येण्याची कॉमन समस्या दिसून आली. अन्य लक्षणांमध्ये श्वास घ्यायला त्रास होणं, डोकेदुखी, मासपेशीतील वेदना, सांधेदुखी, ऐकू न येणं, श्वास घ्यायला त्रास होणं यांचा समावेश होता. लॉन्ग कोविडच्या समस्येचा सामना करत असलेल्यांमध्ये डिप्रेशन आणि एंग्जाइटीची समस्या दिसून आली होती. कोरोना संक्रमणांतर हृदय, फुफ्फुसं, किडनी आणि लिव्हर या अवयवांचे नुकसान होण्याची शक्यता असते.
coronavirus: देशातील सर्व नागरिकांना कोरोना लस मोफत, केंद्रीय मंत्र्यांची घोषणा
लॉन्ग कोविडबाबात ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासानुसार अनेक रुग्णांना कोरोना संक्रमणातून पूर्णपणे बरं झाल्यानंतर फुफ्फुसं आणि हृदयासंबंधी समस्यांचा सामना करावा लागला होता. तसंच ६४ टक्के रुग्णांना श्वास घ्यायला त्रास झाला असून २६ टक्के रुग्णांना हृदयासंबंधी समस्या उद्भवल्या होत्या २९ टक्के लोकांना किडनी आणि १० टक्के लोकांना लिव्हरसंबंधी समस्यांचा सामना करावा लागला होता.
किंग्स कॉलेजच्या तज्ज्ञांना या अभ्यासादरम्यान दिसून आलं की, कोरोना चाचणीत उशिर झाल्यामुळे किंवा परिक्षणात चूक झाल्यास लोकांमध्ये पोस्ट कोविडची लक्षणं विकसित झाली होती. रोमच्या रुग्णालयात झालेल्या एका संशोधनातून दिसून आलं की, १४३ रुग्णांपैकी ८७ टक्के लोकांमध्ये बरं झाल्यानंतर लक्षणं दिसून आली. या रुग्णांमध्ये मासपेशींमध्ये वेदना होणं, थकवा येणं, जुलाब, उलट्या, फुफ्फुसं आणि किडन्यांसंबंधी समस्याही जाणवल्या होत्या. अमेरिकन मेडिकल एसोसिएशनच्या जर्नल JAMA मध्ये हे अध्ययन प्रकाशित करण्यात आलं आहे. यात क्रॉनिक लॉन्ग कोविडच्या अर्ध्यापेक्षा जास्त रुग्णांमध्ये थकवा जाणवल्याचे नमूद करण्यात आलं आहे.