कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना लसीची गरज भासणार नाही? तज्ज्ञांनी सांगितले की.....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 11:55 AM2020-12-21T11:55:30+5:302020-12-21T12:08:52+5:30

CoronaVirus News & latest Updates : कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्यानंतर या आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला कोरोना लसीची आवश्यकता असेल  का असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

Coronavirus vaccine already had covid-19 people need the vaccine know what experts say | कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना लसीची गरज भासणार नाही? तज्ज्ञांनी सांगितले की.....

कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना लसीची गरज भासणार नाही? तज्ज्ञांनी सांगितले की.....

Next

कोरोना व्हायरसची लस चाचणीदरम्यान यशस्वी ठरली असून आता अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरूवात झाली आहे. लसीबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्यानंतर या आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला कोरोना लसीची आवश्यकता असेल  का असा प्रश्न अनेकांना पडत आहे. यावर तज्ज्ञ काय म्हणाले याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

अमेरिकेतील लसीकरण कार्यक्रम सल्लागार समिती (ACIP) नुसार ज्या लोकांना सगळ्यात आधी कोरोनाचं संक्रमण झालं आहे. त्यांनीसुद्धा लस घ्यायला हवी. सीडीसीने दिलेल्या एका अहवालानुसार वैद्यकिय चाचणीतून दिसून येतं की, ज्या लोकांना आधी व्हायरसचं संक्रमण झालं होतं. त्यांच्यासाठीही लस सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. 

आधी कोरोना संक्रमण झाल्यामुळे  रुग्णांच्या शरीरात कोरोनाच्या एंटीबॉडी तयार झालेल्या असतात. त्यामुळे लसीची गरज का आहे. असा प्रश्न उपस्थित होतो. Imanis Life Sciences चे  सीईओ स्टीफन रसेल यांनी हेल्थ वेबसाईटशी बोलताना सांगितले की, संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या शरीरात वेगवेगळ्या स्तरावर एंटीबॉडी तयार होतात. न्यूट्रलाईजिंग एंटीबॉडीजचा उच्च स्तर नवीन इंफेक्शनविरुद्ध लढण्यासाठी सुरक्षा प्रदान करतो.

वैक्सीन 8

डॉक्टर रसेल यांनी सांगितले की,  जर कोणत्या व्यक्तीच्या शरीरात कोविड १९ विरूद्ध लढण्यासाठी योग्य प्रमाणात एंटीबॉडीज तयार झाल्या नसतील तर पुन्हा कोरोना संक्रमण झाल्यानंतर  धोका वाढू शकतो.  कोरोना व्हायरसच्या गंभीर संक्रमणाचा सामना करावा लागलेल्या लोकांच्या बाबतीतही असं होऊ शकतं. फ्रंटियर इन इम्यूनोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार रुग्णालयात भरती असलेल्या कोरोना रुग्णाचे संक्रमण इतके वाढले होते.  त्यामुळे त्यांच्या रोगप्रतिकारकशक्तीने काम करणं बंद केलं होतं. कारण व्हायरसशी लढण्यासाठी योग्य प्रमाणात एंटीबॉडीज तयार झाल्या नव्हत्या.

पोटाच्या विकारांसह थकवा घालवण्यासाठी गुणकारी ठरतं सैंधव मीठ; इतर फायदे वाचून अवाक् व्हाल

लसीच्या सुरक्षेबद्दल बोलताना डॉक्टर रसेल यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचं संक्रमण झालेल्या रुग्णांना संक्रमण होऊन गेल्यानंतर ६ महिन्यांनी  बुस्टर डोज लस दिली जायला हवी. यावर आम्ही अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी सांगितले की,  न्युट्रिलायजिंग एंटीबॉडीजने मिळणारी सुरक्षा आणि इम्यूनिटी एकत्र कमी होऊ लागते. 

चिंताजनक! कोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या ताण-तणावात वाढ; तज्ज्ञांनी सांगितली 'ही' कारणं...

डॉक्टर रसेल यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संक्रमणातून बरं झाल्यानंतर एंटीबॉडीज हळूहळू कमी होऊ लागतात. यातून असं दिसून येतं की लस घेणं लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं. कोरोना व्हायरसच्या लसीचे कसे परिणाम दिसून आले आहेत. याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लस घेतल्यानंतर लोकांना कोरोनापासून दीर्घकाळ सुरक्षा मिळू शकते.  
 

Web Title: Coronavirus vaccine already had covid-19 people need the vaccine know what experts say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.