जगभरासह जपान, कोरिया आणि सिंगापूर या देशांमध्ये कोरोना व्हायरसचं संक्रमण मोठ्या प्रमाणात पसरलं. त्यानंतर लस तयार होण्याची वाट न पाहता ,या देशांतील लोकांनी कोरोनावर मात करत असलेल्या प्रभावी पद्धतींचा अवलंब करायला सुरूवात केली. संपूर्ण जगभरात कोरोना संसर्गापासून बचावासाठी या पद्धतींचा वापर केला जात आहे. पण ज्या वेगानं या तीन देशातील लोकांनी कोरोनावर मात करण्यासाठी या तंत्रांचा वापर केला.त्या वेगाने क्वचित कोणत्याही देशात या पद्धतींचा वापर केला जात आहेत.
संपूर्ण जगभरात कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कच्या वापरावर जोर दिला जात आहे. जपान, कोरिया आणि सिंगापूरसारख्या देशात मास्क वापरणं सक्तीचं करण्यात आलं आहे. याचा परिणाम चांगला दिसून आला आहे. न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये मागील काही दिवसात छापण्यात आलेल्या माहितीनुसार कापडापासून तयार केलेला मास्क सावधगिरीनं वापरल्यास लसीप्रमाणेच प्रभावी ठरू शकतो. हे एक आंतरराष्ट्रीय नियतकालीक आहे.
जेव्हा मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर केला जातो तेव्हा संक्रमित व्यक्तींच्या शरीरातून कोरोना व्हायरसचे ड्रॉपलेट्स खूप कमी प्रमाणात वातावरणात एकत्र होतात. जेव्हा कमी प्रमाणात ड्रॉपलेट्स वातावरणात एकत्र होतात आणि आजूबाजूच्या लोकांनी मास्क लावलेला असतो. तेव्हा शरीरात कमी प्रमाणात व्हायरसचं संक्रमण पसरतं. यामुळे गंभीर स्वरुपाचं संक्रमण होण्यापासून वाचता येऊ शकतं.
अशा स्थितीत जेव्हा कोणच्याही व्यक्तीच्या शरीरात नवीन व्हायरसचा प्रवेश होतो. तेव्हा शरीरात व्हायरसचा लोड कमी असतो. त्यावेळी रोगप्रतिकारकशक्ती व्हायरसला ओळखून लढण्यासाठी एंटीबॉडी तयार करण्यासाठी आणि व्हायरसला नष्ट करण्यासाठी पूर्ण वेळ घेते. म्हणून न लसी तयार होत नाही तोपर्यंत कोरोनावर यशस्वीरित्या मात करण्यासाठी मास्कचा वापर प्रभावी ठरू शकतो.
नवीन वर्षात देशात कोरोनाची लस उपलब्ध होणार, संसदेत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती
भारतात नवीन लसींसाठी चाचण्या फेज 1, फेज 2 आणि फेज 3मध्ये पोहोचल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. ते संसदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली एक तज्ज्ञांचा गट याचा अभ्यास करीत आहे. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीस ही लस भारतात उपलब्ध व्हावी, त्यासाठी आम्ही डब्ल्यूएचओबरोबर समन्वय साधत आहोत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या टप्प्यांची माहिती देताना ते म्हणाले की, सुरुवातीला फक्त एक चाचणी प्रयोगशाळेची सुविधा होती. परंतु आता ती 1700पर्यंत वाढविण्यात आली आहे.आरोग्यमंत्री म्हणाले, आज देशात 110 कंपन्या पीपीई किट बनवतात. देशात व्हेंटिलेटर उत्पादकांची संख्याही 25 झाली आहे. एन 95 मास्कचे 10 मोठे उत्पादक देखील आहेत. यापूर्वी आम्हाला व्हेंटिलेटरच्या आयातीवर अवलंबून राहावे लागायचे. केंद्रीय मंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने कधीही राज्यांमध्ये भेदभाव केलेला नाही.त्यांनी कबूल केले की, या लॉकडाऊनमुळे काही काळ प्रवासी कामगारांची गैरसोय झाली होती, परंतु केंद्रीय गृह मंत्रालयाने जवळपास 64 लाख स्थलांतरित कामगारांना त्यांच्या गावी ट्रेनमधून नेण्यासाठी वेळेवर पाऊल उचलली. डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, कोरोनाचा मृत्यूदर संपूर्ण जगात सर्वात कमी आहे.जेव्हा केंद्रीय आरोग्यमंत्री लोकसभेत कोरोना संसर्ग आणि त्याच्याशी निपटण्यासाठीच्या यंत्रणेविषयी बोलत होते, तेव्हा त्यांचा आवाज माइकवरून येण्याचा थांबला. यानंतर राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी पुढाकार घेतला आणि ही यंत्रणा त्वरित कार्यान्वित करण्यात आली. जेव्हा हर्षवर्धन पुन्हा बोलू लागले, तेव्हा त्यांनी माइक बंद आहे की सुरू हे माहीत नसल्याचं सांगितलं. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
हे पण वाचा-
भारतातही कोरोनाची लस मोफत मिळणार? अमेरिकेने केली मोठी घोषणा
आरोग्यदायी दुधीच्या सालीचे 'हे' फायदे वाचाल; तर फेकून देताना १० वेळा विचार कराल
काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा
मोठा दिलासा! कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना यश; बनवलं कोरोनावर मात करणारं Ab8 औषध