जगभरातसह भारतातही कोरोना व्हायरसनं कहर केला आहे. कोरोनाच्या माहामारीतून बाहेर येण्यासाठी लस कधी येणार किंवा औषध कधी तयार होणार याची प्रतिक्षा सगळ्यांनाच आहे.कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 150 हून अधिक लसींवर जगभरात संशोधन आणि चाचणी सुरू आहे. भारतात कोरोना लसीची 2/3 टप्प्यातील चाचणी सुरू आहे. यांपैकी दोन लसी या भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केल्या आहेत. आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन 'संडे संवाद' या कार्यक्रमाद्वारे कोरोना लसीसह महत्त्वाची माहिती दिली आहे. जुलै 2021 पर्यंत भारतातील कोट्यवधी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचा मानस असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोनाची लस कधी येणार याची सविस्तर माहिती आज दिली आहे. भारतात ४०० ते ५०० दशलक्ष डोस देण्याची सरकारची योजना आहे. साधारणपणे भारतातील २० ते २५ कोटी लोकांपर्यंत पुढच्या वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंत ही लस देण्याचं लक्ष्य आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगतिलं. तसंच कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबरअखेरपर्यंत सूचना मागवल्या असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
भारतात कोरोनी लसीची स्थिती (स्टेसस) काय आहे?
- ICMR-भारत बायोटेकची Covaxin या लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी अनेक केंद्रांमध्ये सुरू आहे.
- झायडस कॅडिलाची ZyCov-D या लसीची चाचणी माणसांवर सुरू आहे.
- ऑक्सफर्ड-अस्त्राजेनेकाआणि सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या Covishield या लसीची 2/3 टप्प्यातील चाचणी सुरू आहे.
दरम्यान जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्ताची संख्या ही तब्बल तीन कोटींच्या वर गेली आहे. तर लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांचा आकडा 65 लाखांवर गेला असून कोरोनाने देशातील तब्बल 1 लाख लोकांचा बळी घेतला आहे.
दिलासादायक! लॉकडाऊनचा आरोग्यावर चांगला परिणाम; कमी झाले 'या' आजाराचे रुग्ण, रिसर्च
रविवारी (4 ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 75,829 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 940 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 65 लाख 49 हजारांवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा तब्बल एक लाखांवर पोहोचला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अरे व्वा! IIT तज्ज्ञांनी तयार केला अनोखा टी-शर्ट; संपर्कात येताच कोरोना व्हायरस नष्ट होणार