२०२० मध्ये वजन कमी करण्यासाठी 'हे' धोकादायक ट्रेन्ड्स फॉलो करणं बंद करा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 11:26 AM2020-01-01T11:26:13+5:302020-01-01T11:31:04+5:30
वजन कमी करून स्वत:ला स्लिम करणे अलिकडे कठीण झाले आहे. याचं कारण सध्याची सुस्त लाइफस्टाईल आणि असंतुलित खाण्या-पिण्याच्या सवयी.
वजन कमी करून स्वत:ला स्लिम करणे अलिकडे कठीण झाले आहे. याचं कारण सध्याची सुस्त लाइफस्टाईल आणि असंतुलित खाण्या-पिण्याच्या सवयी. फिटनेस सर्वांनाच चांगली ठेवायची असते. पुरूष तर यासाठी वेगवेगळ्या पद्धती सुद्धा वापरतात. आता नव्या वर्षाला सुरूवात झाली आहे. इतराप्रमाणे तुम्ही सुद्धा वजन कमी करण्याचा प्लॅन केला असावा. त्यासाठी एखाद्या पद्धतीचा देखील विचार केला असेलच. पण आम्हाला वाटतं की, तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात काही चुका करू नये. अनेकजण या चुका करतात आणि त्यांना यामुळे नुकसानाचा सामना करावा लागतो.
असंही असू शकतं की, गेल्य काही महिन्यांपासून तुम्ही फिटनेससाठी काहीतरी ट्राय करत असाल. तरी सुद्धा वजन कमी होत नसेल. मुळात याची कारणे शोधली पाहिजे. कदाचित तुम्ही वजन कमी करण्यासाठी चुकीची पद्धत वापरत असाल. हे लक्षात घेतलं पाहिजे की, वजन कमी करण्याची एक पद्धत असते. अनेकजण वेगवेगळे उपाय करून वजन कमी तर करतात, पण त्यांच्या शरीरावर नंतर अनेक साइड इफेक्टही बघायला मिळतात.
त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही पद्धतींबाबत सांगत आहोत की, तुम्ही त्या लगेच बंद केल्या पाहिजे. कारण या पद्धती आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. चला जाणून घेऊ वजन कमी करण्याच्या नादात कोणत्या चुका करू नये.
१) वजन कमी करण्याची टॅबलेट
आजकाल वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या सप्लीमेंट्स आणि टॅबलेट्स घेतात. लोकांमध्ये वजन कमी करण्यासाठी टॅबलेट घेण्याची इच्छा जागृत करण्यात जाहिरातींची महत्वाची भूमिका आहे. भ्रामक जाहिराती बघून लोक टॅबलेटचं सेवन सुरू करतात.
जर टॅबलेट घेऊन वजन कमी झालं असतं तर कुणीही डाएट किंवा वर्कआउट फॉलो नसतं केलं. खरंतर या टॅबलेटचं सेवन करून हार्ट रेट वाढतो आणि भविष्यात याने समस्या होऊ लागतात. जर तुम्ही सुद्धा असं काही करत असाल तर वेळीच बंद करून नियंत्रित आहार आणि वर्कआउटला प्राधान्य द्यावं.
२) जेवण बंद करणे
जेवण बंद करणे ही वजन कमी करण्याची सर्वात चुकीची पद्धत आहे. लोकांमध्ये असा गैरसमज असतो की, जेवण बंद केलं की, ते कॅलरी कमी घेतील. याने वजन कमी करण्यास मदत मिळेल. तसेच अनेकजण वजन कमी करण्यासाठी नाश्ता करणंही बंद करतात. नंतर भूक लागल्यावर दुपारच्या जेवणात जास्त खातात. याने वजन कमी होण्याऐवजी वाढतं. जर तुम्ही सुद्धा वजन कमी करण्यासाठी असंच काही करत असाल तर वेळीच थांबवा. कमी खावं पण नक्की खावं. दिवसातून काही वेळ थोडं थोडं खाल्ल्याने मेटाबॉलिज्म फास्ट होतं. ज्याने वजन कमी करण्यास मदत मिळते.
३) लगेच खचून जाऊ नका
वजन कमी करणाऱ्यांना लगेच रिझल्ट हवे असतात. पण हे लक्षात घ्यायला हवं की, शरीराचं वजन हे हळूहळू वाढलेलं असतं, त्याच वेगाने ते कमी होईल. अनेकांची तक्रार असते की, त्यांचं वजन १०० किलो झालंय. पण ते वाढायला अनेक महिने लागलेत. त्यामुळे लगेच काही दिवसात वजन कमी होण्याची आशा बाळगू नका. नियमित एक्सरसाइज, नियंत्रित आहार, सकारात्मक दृष्टीकोन ठेवाल तर तुम्हाला रिझल्ट दिसेल. एकदम वजन कमी करण्याचा प्रयत्न नुकसानकारक ठरू शकतो.
४) अग्रेसिव्ह वर्कआउट प्लॅन
वजन कमी करण्यासाठी अनेकजण अग्रेसिव्ह एक्सरसाइज रूटीन फॉलो करतात. याने रिझल्ट मिळतही असेल पण शरीराचं नुकसान होण्याचा धोका अधिक असतो. वजन कमी करण्यासाठी १ ते दीड तास कार्डिओ एक्सरसाइज पुरेशी आहे. मात्र, अनेकजण सकाळी-सायंकाळी कित्येक तास जिममध्ये हेवी वर्कआउट करतात. याचा शरीरावर चुकीचा प्रभाव पडतो.
५) फास्टिंग
फास्टिंगने वजन कमी होतं असं अनेकांना वाटतं. पण यात जास्त सत्य नाही. आठवड्यातून १ किंवा २ दिवस फास्टिंग करून बॉडी डिटॉक्स होते. पण फास्टिंगच्या नावावर जेवण बंद करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कारण याने शरीरात व्हिटॅमिन आणि न्यूट्रिएंट्स कमी होता. याने समस्या होऊ शकते.