मासिक पाळीमध्ये 'या' 4 समस्या आढळल्या तर, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 03:03 PM2019-04-19T15:03:21+5:302019-04-19T15:04:25+5:30
मासिक पाळीमध्ये अनेक महिलांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. मासिक पाळीदरम्यान, मेंस्ट्रुअल क्रॅम्स, मूड स्विंग्स, ब्लोटिंग आणि पिंपल्स यांसारख्या अनेक समस्यांचा सामना महिला करत असतात.
(Image Credit : wanista.com)
मासिक पाळीमध्ये अनेक महिलांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. मासिक पाळीदरम्यान, मेंस्ट्रुअल क्रॅम्स, मूड स्विंग्स, ब्लोटिंग आणि पिंपल्स यांसारख्या अनेक समस्यांचा सामना महिला करत असतात. एवढचं नाही तर अनेकदा या दिवसांमध्ये प्रचंड वेदना होत असतात. प्रत्येकीला वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. काही जणींना कमी ब्लिडींग होतं, तर काही जणींना जास्त. काहींना अनियमित मासिक पाळीचा त्रास सहन करावा लागतो तर काही जणींना पोट आणि कंबरदुखीच्या प्रचंड वेदनांना सामोरं जावं लागतं. अनेकदा या लक्षणांचा सामना शरीराच्या इतर समस्यांमुळेही करावा लागतो. जाणून घेऊया मेंस्ट्रुअल सायकल तुमच्या आरोग्याबाबत काय सांगतं त्याबाबत...
मेंस्ट्रुअल पेन
जवळपास 70 टक्के महिला मासिक पाळी दरम्यान अब्डॉमिनल पेन, क्रॅम्प्स आणि ब्लोटिंगच्या समस्येचा सामना करत असतात. या दिवसांमध्ये वेदना होतात कारण प्रत्येक महिन्यामध्य गर्भाशयातील मांसपेशी रक्तस्त्राव होत असतो आणि त्यामुळेच वेदना होत असतात. जर तुम्ही या वेदनांचा सामना सतत करत असाल तर तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. मासिकपाळीदरम्यान होणाऱ्या वेदना एंडोमेट्रियोसिस, वजायनल स्कॅरींग किंवा फायब्रॉएड्सची लक्षणं असू शकतात.
मासिक पाळीत होणाऱ्या रक्तस्रावाचा रंग
पिरियड्समध्ये होणाऱ्या ब्लिडींगचा रंग लाल असणं सामान्य गोष्ट आहे. परंतु जर हा रंग पुसट लाल किंवा काळपट दिसत असेल तर याकडे दुर्लक्षं करणं महागात पडू शकतं. दे हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, जर पिरियड्सचा रंग स्ट्रॉबेरी जॅमप्रमाणे दिसत असेल तर हा संकेत तुमच्या शरीरामध्ये एस्ट्रोजेनचा स्तर कमी असल्याचं सांगतं. ही वजायनल ड्रायनेस, थकवा, लो लिबिजो आणि केस गळण्याच्या समस्या यांचं लक्षण असू शकतं.
अनियमित मासिक पाळी
गरोदरपणाशिवाय जर तुमची मासिक पाळी अनियमित असेल तर तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण हे थायरॉइड किंवा हार्मोनल असंतुलन असण्याचं लक्षणं असू शकतं. यामुळे अंडाशयामध्ये अल्सर होण्याची शक्यता असते. कधी-कधी हे जास्त तणावामुळेही होऊ शकतं. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज असते.
जास्त रक्तस्त्राव
मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होणं सामान्य असतं. परंतु जर तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीही जास्त रक्तस्राव होत असेल आणि तुम्ही 3 ते 4 तासांमध्ये पॅड चेंज करत असाल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण ही लक्षणं हीमोफीलिया, हार्मोनल असंतुलन, फायब्रॉएड्स किंवा ब्रेन ट्यूमरची असू शकतात.
टिप : वरील सर्व गोष्टी केवळ माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणत्याही समस्येचा त्रास सहन करावा लागत असेल तर त्वरीत तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.