तुम्ही प्लॅस्टिकचा तांदूळ तर खात नाही ना? घरच्या घरी या 7 टेस्ट करून पाहा!
By admin | Published: June 20, 2017 06:20 PM2017-06-20T18:20:06+5:302017-06-20T18:20:06+5:30
आपण घेतला तो तांदूळ खरा आहे की प्लॅस्टीकचा हे ओळखणं अगदीच सोपं आहे
- सारिका पूरकर-गुजराथी
गेल्या आठवड्यात हैदराबादमधील एका इसमानं प्लॅस्टिक तांदुळ वापरुन बिर्याणी तयार केली जात असून ती ग्राहकांना सर्व्ह केली जात असल्याची तक्रार केली होती. तसेच त्यानंतर एका व्यक्तीनं स्थानिक किराणा दुकानातही प्लॅस्टिक तांदळाची विक्री होत असल्याची तक्रार केली होती. एवढंच नाही तर प्लॅस्टिक तांदळापासून केलेल्या भाताचे बॉल्स कसे चेंडूप्रमाणे उसळी मारतात याचा व्हिडिओही जारी करण्यात आला होता. यास्वरूपाच्या तक्रारीनंतर हैदराबाद, तेलंगाणा, उत्तराखंड या भागात प्लॅस्टिक तांदळाची चांगलीच धास्ती नागरिकांनी घेतली आहे. कारण हा प्लॅस्टिक तांदुळ चीनी बनावटीचा तर आहेच शिवाय तो आरोग्याला अत्यंत घातक आहे.