वजन कमी करण्यासाठी आपण व्यायामाबरोबरच डाएटिंगही तितकेच महत्वाचे आहे. मात्र डाएटिंगबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. वजन कमी करण्यासाठी बरेचदा काहीजण उपाशी राहतात. हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. आज आम्ही तुम्हाला डाएटमध्ये आपण करत असलेल्या चुकांबद्दल सांगणार आहोत.
सलाड खाणेसलाड खाणे हा वजन कमी करण्याचा अत्यंत उत्तम पर्याय आहे. सलाड तयार करण्यासाठी जास्तीत-जास्त हिरव्या भाज्यांचा वापर केला पाहिजे. फायबर्सने परिपूर्ण असे सलाड खाल्ल्याने पोटातील जमा विषारी घटक शरीराबाहेर फेकले जातात.
कमी कार्बोहायड्रेट आहारवजन कमी करण्यासाठी आहार घेत असताना आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे न घेणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. आहारात सहसा कार्ब, फॅट आणि कॅलरीचे प्रमाण कमी होते. यामुळे, फायबर, ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे प्रमाण देखील कमी होते. यामुळे डाएटदरम्यान आपण हेल्दी आहार घेतला पाहिजेत.
नाश्ता करणेनाश्ता हा आपल्या संपूर्ण दिवसात उर्जा टिकवण्यासाठी महत्वाचा आहार आहे. त्यामध्ये फायबर, कार्ब आणि प्रथिने असावीत जेणेकरुन आपल्याला दिवसभर ऊर्जा मिळेल. म्हणूनच सकाळी नाश्ता न करणे ही आपली सर्वात मोठी चूक आहे. या सवयीमुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.
जास्त पाणी प्यापाणी पिण्याने शरीरातील घातक गोष्टीबाहेर पडतात आणि शरीरात साठलेले जादा फॅट्स कमी होतात. ज्यामुळे वजन नियंत्रित राहते. यामुळे डाएटदरम्यान जास्त पाणी पिण्यावर भर द्या. पाणी पिणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी देखीप खूप फायदेशीर आहे.