Selfie घेण्याच्या नादात तुटू शकतो हात, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 12:02 PM2019-01-04T12:02:08+5:302019-01-04T12:04:48+5:30
ज्या व्यक्तीला सेल्फी घेण्याची आवड नसेल त्याच्याकडे एक तर स्मार्टफोन नसेल किंवा तो फारच स्मार्ट असेल.
ज्या व्यक्तीला सेल्फी घेण्याची आवड नसेल त्याच्याकडे एक तर स्मार्टफोन नसेल किंवा तो फारच स्मार्ट असेल. असो....ज्या लोकांना सेल्फी घेण्याची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सेल्फीच्या नादात आतापर्यत अनेकांनी जीन गमावल्याचं तुम्ही वाचलं असेल तसेच सेल्फीच्या सवयीने मानसिक आजारही होऊ शकतो हेही वाचलं असले. आता सेल्फीमुळे होणारी नवी समस्या समोर आली आहे.
सेल्फीची असणाऱ्यांना होणाऱ्या या आजाराला Selfie Wrist असं म्हटलं जातं. सॅन फ्रॅन्सिस्कोचे डॉक्टर लेवी हॅरीसन हे सांगतात की, हा कोणता आजार नाहीये, पण एक वाईट सवय आहे. लोकांमध्ये सेल्फीची क्रेझ वाढण्यासोबतच त्यांच्यात ही Selfie Wrist ही समस्याही वाढताना दिसत आहे.
जास्त सेल्फी काढल्याने मनगट, खांदे आणि हाताच्या अंगठ्यांसोबतच बोटांमध्ये फार वेदना होण्याचा धोका वाढतो. एकीकडे लोकांमध्ये एकीकडे सेल्फीची क्रेझ वाढत आहे तर दुसरीकडे त्यांना शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. द आयरिश मेडिकल जर्नलनुसार, ४ अशा केसेस समोर आल्या आहेत, ज्यात सेल्फीमुळे लोकांचे मनगट तुटले आहेत.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, २५९ लोक तर धोकादायक पद्धतीने सेल्फी घेण्याच्या नादात आपला जीव गमावून बसले आहेत. ही आकडेवारी २०११ ते नोव्हेंबर २०१७ पर्यंतची आहे. सेल्फी घेण्यासाठी सर्वात धोकादायक देश भारत मानला जातो. त्यानंतर रशिया, अमेरिका आणि नंतर पाकिस्तानचा क्रमांक लागतो.
सेल्फीमुळे होतो हा मानसिक आजार
लोकांची सेल्फी घेण्याची सवय एका गंभीर आजाराचं रुप घेत आहे. याला मेडिकल सायन्समध्ये स्नॅपचॅट डिस्मोर्फिया हे नाव देण्यात आलं आहे. हा आजार केवळ मानसोपचार तज्ज्ञच नाही तर प्लास्टिक सर्जरीशी निगडीत लोकांसाठीही आव्हान ठरत आहे. हा एकप्रकारचा मेंटल डिसऑर्डर आहे. ज्यात व्यक्ती आपली काल्पनिक प्रतिमा दाखवतो. इतर मानसिक आजारांप्रमाणेच या आजारातही मनासारखा फोटो न मिळाल्याने व्यक्तीचा चिडचिडेपणा वाढतो आणि ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते.