उन्हाळ्यात खिशात कांदा ठेवून उष्माघाताचा धोका टाळता येतो? जाणून घ्या सत्य...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 05:01 PM2024-03-06T17:01:12+5:302024-03-06T17:01:46+5:30
Heat stroke : उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आजही काही लोक खिशात कांदा ठेवतात. पण खरंच खिशात कांदा ठेवण्याने उष्माघातापासून बचाव होतो का?
Heat stroke : उन्हाळ्यात अनेकदा उन्ह लागण्याचा म्हणजे उष्माघाताचा धोका अधिक असतो. बाहेर जाताना योग्य ती काळजी घेतली नाही तर तुम्हाला उन्हाचा तडाखा बसू शकतो. आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. अनेकदा तर व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आजही काही लोक खिशात कांदा ठेवतात. पण खरंच खिशात कांदा ठेवण्याने उष्माघातापासून बचाव होतो का?
काय आहे सत्य?
जुन्या काळात वाहनांची जास्त सोय नव्हती, ज्यामुळे लोकांना एका गावातून दुसऱ्या गावात पायी चालत जावं लागत होतं. यामुळे उन्हाळ्यात लोक खिशात कांदा ठेवत होते. कारण यात वॉलटाईल ऑइल असतं, ज्यामुळे शरीराचं तापमान सामान्य ठेवण्यास मदत होते. पण केवळ कांदा खिसात ठेवून उष्माघाताचा धोका कमी करणं शक्य नाही.
जेवतानाही खावा कांदा
एक्सपर्ट्सनुसार, उन्हाळ्यात कांदा आपल्या रोजच्या आहाराचा भाग असला पाहिजे. याने बाहेरच्या तापमानाच्या प्रभावापासून बचाव करण्यास मदत मिळते. या असलेलं वॉलटाईल ऑइल एकीकडे शरीराला थंड ठेवतं तर सोबतच पोटॅशिअम आणि सोडिअमही शरीराला देतं. कच्चा कांदा अन्न पचवण्यासही मदत करतो. ज्यामुळे पोटासंबंधी समस्या होत नाहीत. एक्सपर्ट रोज एक मीडिअम साइजचा कच्चा कांदा खाण्याचा सल्ला देतात.
उष्माघातापासून वाचण्यासाठी आहार
एक्सपर्ट्सनुसार, जर रोजचा आहार योग्य असला तर उष्माघातापासून बचाव करता येऊ शकतो. नॅशनल हेल्थ पोर्टलवर असलेल्या एका माहितीनुसार, लोकांनी उन्हाळ्यात ताजी फळं, भाज्या आणि ज्यूसचं सेवन केलं पाहिजे. यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण बरोबर राहतं. ज्यामुळे शरीराला डिहायड्रैशनपासून बचाव करण्यास मदत मिळते. शरीरात पाणी कमी झालं तर उष्माघाताचा धोका जास्त राहतो.
उन्हाळ्यात काय खावं?
उन्हाळ्यात रोज संत्री, अननस, कलिंगड, द्राक्ष खावेत.
कांदे, मिंट आणि खरबुजाचं सॅलडही शरीर थंड ठेवतं.
रोज एक किंवा दोन ग्लास फळांचा ज्यूस प्यावा.
दही, छास किंवा लस्सीचं सेवन करावं.