मास्क लावल्याने गुदमरल्यासारखं होतं का?... मग या साध्या-सोप्या टिप्स वाचाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 05:14 PM2021-05-05T17:14:28+5:302021-05-05T17:27:37+5:30

मास्क सारखा काढावासा वाटतो? सतत गुदमरल्यासारखं वाटतं? म्हणूनच या टीप्स वाचून घ्याच. बघा अशावेळी तुम्ही काय करू शकता.

Does wearing a mask make you feel suffocated? ... Then read these simple tips! | मास्क लावल्याने गुदमरल्यासारखं होतं का?... मग या साध्या-सोप्या टिप्स वाचाच!

मास्क लावल्याने गुदमरल्यासारखं होतं का?... मग या साध्या-सोप्या टिप्स वाचाच!

googlenewsNext

कोरोनाचा धोका वाढतोय तसाच कोरोना होऊ नये म्हणून प्रतिबंध देखील वाढवावा लागतोय. त्यात मास्क वापरणं बंधनकारकच. बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की मास्क वापरताना श्वास घेण्यास त्रास होतो किंवा  गुदमरल्यासारखे वाटते. अशावेळी तुम्ही काय करु शकता याच्या काही टीप्स...

१. मास्क वापरताना पहिल्यांदा हे लक्षात घ्या की तुमचा श्वासोच्छवास कसा सुरू आहे. अर्थात तुम्ही नाकाने श्वास घेताय की तोंडाने. तोंडाने श्वास घेतल्याने श्वसन व्यवस्थित होत नाही. म्हणून जास्तीत जास्त नाकाने श्वास घेण्याचा प्रयत्न करा. यासाठी अत्यंत सोपा उपाय आहे.

मास्क लावून श्वास घेताना आपला हात पोटावर ठेवा. श्वास घेताना तुमचे पोट की छाती वरखाली होत आहे याचे निरिक्षण करा. आता हात पोटावर ठेऊन मास्क वापरतानाही श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. याचा सतत सराव करत राहिल्याने तुम्ही मास्क वापरतानाही आणखी उत्तम क्षमतेने श्वासोच्छवास करू शकता. 

२. मास्क लावल्यावर तुमचे शरीर शिथिल राहू द्या. यासाठी तुम्ही काही व्यायामही करू शकता.

  • खांदे वर खाली करणे.
  • हात गोलाकार फिरवणे.
  • हातांना स्ट्रेच करणे.
  • एकदा उजव्या आणि एकदा डाव्या बाजूला वाका.
  • नियमित व्यायाम केल्याने तुमची श्वसन क्षमता वाढते.

३. तसेच मास्क व्यवस्थित लावणेही गरजेचे आहे. काही लोक मास्क चुकीच्या पद्धतीने वापरतात. त्यामुळेही श्वास घेताना त्रास होऊ शकतो.

  • तुमचे पूर्ण तोंड आणि नाक झाकले जाईल अशा पध्दतीने मास्क वापरा.
  • अनेकांचा गैरसमज असतो. की मास्क वापरल्याने ऑक्सिजन कमी प्रमाणात शरीरात जातो. पण खऱंतर आपल्या मास्कमधून ऑक्सिजन अथवा कार्बन डायोक्साईड सहज आतबाहेर जाऊ शकतो. लक्षात घ्या विषाणू प्रवेश करू शकत नाहीत.

 

४. तुम्ही मास्क काही वेळासाठी काढू शकता. याला ब्रीदिंग ब्रेक्स असही म्हटलं जातं.

  • ज्यावेळी तुम्ही एखाद्या सुरक्षित जागेत असाल. म्हणजेच जिथे गर्दी अथवा आजूबाजूला कोणी नसेल त्याचवेळी काही मिनिटांसाठी मास्क काढू शकता.
  • एकदा दोनदा श्वास- उच्छवास घ्या आणि पुन्हा मास्क लावा. लक्षात घ्या मास्क सतत काढू नका.

 

५.तुम्ही जितके पाणी प्याल किंवा सरबत, फळांचा रस असे द्रव पदार्थ घ्याल तितकीच तुमची मास्क लावूनही श्वास घेण्याची क्षमता वाढते.

Web Title: Does wearing a mask make you feel suffocated? ... Then read these simple tips!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.