रात्री झोपण्याआधी पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 10:50 AM2024-03-04T10:50:40+5:302024-03-04T10:51:34+5:30
एक्सपर्टनुसार, रात्री झोपण्याआधी पाणी सावधनतेने प्यायलं पाहिजे. चूक केली तर शरीराच्या काही भागात सूज येण्याची समस्या होऊ शकते.
Tips To Drink Water At Night: आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणं फार गरजेचं असतं. डॉक्टर दिवसातन 3 ते 4 लीटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. भरपूर पाणी प्यायल्याने शरीर चांगलं राहतं. पण अनेकांना पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत नसते. अनेकांना हे माहीत नसतं की, रात्री झोपण्याआधी पाणी प्यावे की नाही. एक्सपर्टनुसार, रात्री झोपण्याआधी पाणी सावधनतेने प्यायलं पाहिजे. चूक केली तर शरीराच्या काही भागात सूज येण्याची समस्या होऊ शकते.
डायटिशियन कामिनी सिन्हा यांच्यानुसार, रात्री झोपण्याआधी लगेच पाणी पिणं फायदेशीर नसतं. सामान्यपणे लोकांना झोपण्याच्या साधारण 1 तासआधी पाणी प्यायला हवं. झोपण्याआधी दूध पिणं फायदेशीर असतं. दूध प्यायल्याने तुम्हाला प्रोटीन मिळतं, जे झोपताना तुमच्या शरीराला फायदे देतं.
कॉन्स्टिपेशनच्या रूग्णांसाठी सल्ला
डायटिशियन कामिनी म्हणाल्या की, कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेची समस्या असणाऱ्यांनी झोपण्याआधी थोडं पाणी प्यावं. तसेच त्यांनी सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी खूप पाणी प्यावं. याने त्यांची समस्या दूर होईल आणि डायजेशन सिस्टीमही चांगली होईल. महत्वाचं म्हणजे लोकांनी दररोज कमीत कमी 2 ते 3 लीटर पाणी नक्की प्यावं. जेणेकरून शरीर हाइड्रेटेड रहावं आणि डिहाइड्रेशनची समस्या होई नये. पाणी शरीरासाठी फार महत्वाचं असतं आणि उन्हाळ्यात पाणी आणखी जास्त गरजेचं असतं. किडनी स्टोनच्या रूग्णांसाठी पाणी अधिक फायदेशीर ठरतं.
रात्री दूध पिणं फायदेशीर
एक्सपर्टनुसार, रात्री झोपण्याआधी दूध पिणं फायदेशीर मानलं जातं. याने डायजेशन सिस्टीम चांगली राहते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असलेल्या लोकांनी एक ग्लास कोमट दूध प्यावं. याने थकवा दूर होतो आणि चांगली झोप येते. आयुर्वेदात सांगितलं आहे की, रात्री दूध पिणं सगळ्यात जास्त फायदेशीर असतं.
जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे नुकसाने
पचनक्रिया प्रभावित होते
अन्न पचन्यासाठी पोटात अॅसिड आणि इतर पाचक रसांची गरज असते. पाणी प्यायल्याने हे रस पातळ होतात. ज्यामुळे अन्न पचन्यास समस्या होते. याने पोटात गॅस, पोट फुगणं, अपचन अशा समस्या होतात.
पोषक तत्व कमी अब्जॉर्ब होतात
अन्नातील पोषक तत्व अब्जॉर्ब करण्यासाठी पोटात अॅसिड आणि इतर पाचक रस गरजेचे असतात. पण पाण्यामुळे हे रसा पातळ होतात, ज्यामुळे पोषक तत्व अब्जॉर्ब कमी होतात. यामुळे शरीरात कमजोरी, थकवा आणि इतर आरोग्यासंबंधी समस्या होतात.
पोटात गॅस आणि पोट फुगणे
जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटातील अन्न आणि गॅस यांच्यातील मिश्रण पातळ होतं. ज्यामुळे पोटात गॅस वाढू लागतो. यामुळे पोट फुगणं, पोटदुखी आणि अस्वस्थता अशा समस्या होऊ लागतात.
अपचन आणि बद्धकोष्ठता
पाणी प्यायल्याने पोटातील अॅसिड पातळ होतं. ज्यामुळे अन्न पचन्यास अडचण येते. यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.
पोटात अॅसिडिटी
जसे की, आधी सांगितलं जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटातील गरजेचं अॅसिड पातळ होतं. ज्यामुळे पोटात अॅसिडिटी वाढते. यामुळे पोटात जळजळ, अल्सरसारख्या समस्या होऊ शकतात.