काही लोकांसाठी गाजर खाणं ठरू शकतं नुकसानकारक, जाणून घ्या कुणी खाऊ नये!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 01:01 PM2024-11-22T13:01:09+5:302024-11-22T13:07:36+5:30
Carrot Side Effects : काही लोकांसाठी गाजराचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात जाणून घेऊ गाजर कुणासाठी घातक ठरू शकतं.
Carrot Side Effects : हिवाळ्यात भरपूर लोक आवडीने गाजर खातात. गाजरामध्ये अनेक पोषक तत्व असतात जसे की, आयर्न, बीटा कॅरोटीन, अॅंटी-ऑक्सिडेंट्स, अॅंटी-इन्फ्लेमेटरी इत्यादी भरपूर असतं. अशात याने आरोग्यालाही अनेक फायदे होतात. मात्र, काही लोकांसाठी गाजराचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात जाणून घेऊ गाजर कुणासाठी घातक ठरू शकतं.
एलर्जीची समस्या
गाजराचं सेवन केल्याने काही लोकांना एलर्जी होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांनी गाजराचं सेवन करू नये. या लोकांनी जर गाजराचं सेवन केलं तर त्वचेवर रॅशेज, एलर्जी, जुलाब, अपचन अशा समस्या होऊ शकतात.
त्वचेचा पिवळेपणा वाढेल
काही लोकांनी जर गाजराचं अधिक सेवन केलं तर त्वचेचा पिवळेपणा वाढू शकतो. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असतं, जे शरीरात पोहोचल्यावर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होतं. जास्त प्रमाणात गाजराचं सेवन केल्याने रक्तात कॅरोटीनचं प्रमाण वाढतं. अशात त्वचेचा पिवळेपणा अधिक वाढू शकतो.
डायबिटीसचे रूग्ण
ब्लड शुगरच्या रूग्णांनी गाजराचं अधिक प्रमाणात सेवन करू नये. कारण गाजरांमध्ये नॅचरल शुगर अधिक प्रमाणात असते. अशात जर तुम्ही गाजराचं सेवन अधिक केलं तर शरीरात शुगरचं प्रमाण वाढू शकतं. अशात गाजराचं सेवन कमी प्रमाणात करा.
स्तनपान करणाऱ्या महिला
स्तनपान करणाऱ्या महिलांनी सुद्धा गाजराचं अधिक प्रमाणात सेवन करू नये. कारण याच्या जास्त सेवनाने दुधाची टेस्ट बदलते. अशात बाळाला दूध पिण्यास समस्या होऊ शकते. सोबतच याने महिलेला समस्याही होऊ शकते.
गाजर खाण्याचे नुकसान
लहान मुलांसाठी गाजर जास्त फायदेशीर असतात. पण त्यांचं सेवन कमी प्रमाणात केलं पाहिजे. जर तुम्ही जास्त प्रमाणात गाजर खायला देत असाल तर त्यांना त्रास होऊ शकतो. मुलांना गाजर जास्त प्रमाणात खायला दिल्याने पोटात दुखणे, मुरडा येणे अशा समस्या होतात.