मोठ्यातला मोठा किडनी स्टोन बाहेर काढण्याचे सोपे उपाय, लगेच मिळेल आराम!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 04:47 PM2024-03-11T16:47:50+5:302024-03-11T16:48:15+5:30
Kidney Stone : किडनी स्टोनची समस्या या दिवसांमध्ये कॉमन झाली आहे. ही समस्या पुरूषांमध्ये बघायला मिळते. ही समस्या सामान्यपणे अशा लोकांना जास्त होते जे पाणी कमी पितात.
Effective methods to dissolve kidney stone: जर तुम्हाला आधीच किडनी स्टोनची समस्या झाली असेल आणि ही समस्या पुन्हा होऊ द्यायची नसेल तर काही सोपे उपाय करू शकता. आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने किडनी स्टोन होणं रोखू शकता.
किडनी स्टोनची समस्या या दिवसांमध्ये कॉमन झाली आहे. ही समस्या पुरूषांमध्ये बघायला मिळते. ही समस्या सामान्यपणे अशा लोकांना जास्त होते जे पाणी कमी पितात. ज्यामुळे किडनीमध्ये काही विषारी पदार्थ जमा होऊन स्टोन तयार होतात.
हार्वर्ड वेबसाईटवर हार्वर्ड मॅसाचुसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये किडनी स्टोनचे डॉ. डॉ. ब्रायन आइजनर यांच्यानुसार, महिलांच्या तुलनेत पुरूषांना किडनी स्टोन होणं कॉमन आहे. ज्या लोकांना आधी किडनी स्टोन झाला आहे त्यातील अर्ध्या लोकांना पुन्हा 10 ते 15 वर्षानंतर किडनी स्टोन होण्याचा धोका असतो.
स्टोन किडनीमध्ये तेव्हा तयार होतात जेव्हा कॅल्शिअम, ऑक्सालेट आणि यूरिक अॅसिड इत्यादी किडनीमध्ये स्टोनच्या रूपात जमा होऊ लागतात आणि हळूहळू यांचा आकार वाढतो. या स्टोनमध्ये जवळपास 80% ते 85% कॅल्शियम आणि बाकी यूरिक अॅसिडपासून तयार स्टोन असतात. ही समस्या अशा लोकांना जास्त होते ज्यांच्यात लो यूरिन पीएच लेव्हल अधिक असते. यामुळे जास्त वेदना होतात.
यावर उपाय तसा तर औषधं आणि ऑपरेशनच्या माध्यमातून केला जातो. पण तुम्ही काही घरगुती उपाय करूनही किडनी स्टोन दूर करू शकता.
घरगुती उपाय
नॅशनल किडनी फाउंडेशननुसार, जर व्यक्तीने रोज दोन ती अडीच लीटर लघवी पास केली तर त्यांना किडनी स्टोन होण्याची समस्या 50 टक्के कमी होऊ शकते. यासाठी कमीत कमी 2 लीटर पाणी पिणं गरजेचं आहे. जर तुम्ही डाएटमध्य दही, सोया प्रोडक्ट, बीन्स, डाळी आणि कडधान्य इत्यादींचा समावेश कराल तर यातील प्लांट कॅल्शिअममुळे किडनीमध्ये स्टोन होण्याचा धोका कमी राहतो.
रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, जर अर्धा कप लिंबाच्या रसात पाणी टाकून रोज प्याल तर किडनी स्टोनचा धोका कमी करू शकता. त्याशिवाय मिठाचं सेवन आहारातून कमी करा.