पहिल्यांदा आई-बाबा होणारे लोक ६ वर्ष पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत - सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 10:27 AM2019-03-01T10:27:19+5:302019-03-01T10:29:36+5:30
पहिल्यांदा एका बाळचे आई-वडील होणं ही बाब कुणासाठीही एक फार वेगळा अनुभव असतो.जेव्हा लाइफमध्ये तुमचं पहिलं बाळ येतं तेव्हा लाइफ पूर्णपणे बदललेली असते.
(Image Credit : www.studyfinds.org)
पहिल्यांदा एका बाळचे आई-वडील होणं ही बाब कुणासाठीही एक फार वेगळा अनुभव असतो.जेव्हा लाइफमध्ये तुमचं पहिलं बाळ येतं तेव्हा लाइफ पूर्णपणे बदललेली असते, तसेच जीवन जगण्याचा दृष्टीकोनही बदलतो. तुम्हाला सतत सतर्क रहावं लागतं. लाइफही बाळाच्या अवतीभवती फिरू लागत असतं. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, पहिल्यांदा आई-वडील लोक बाळाच्या जन्मानंतर साधारण ६ वर्षांपर्यंत ठिकपणे झोपू शकत नाहीत किंवा असं म्हणूया की, ते पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत.
या रिसर्चमध्ये २००८ ते २०१५ दरम्यानच्या २ हजार ५०० महिला आणि २ हजार २०० पुरूषांचा एक सर्व्हे करण्यात आला. ज्यात या लोकांनी त्यांच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या बाळाच्या जन्मासंबंधी प्रश्नांची उत्तरे दिली आणि आपले अनुभव शेअर केले. या लोकांना बाळाच्या जन्मानंतर झोपेला १ ते १० असं रेटींग देण्यास सांगण्यात आलं आणि हेही विचारलं गेलं की, नॉर्मल दिवसांमध्ये आणि वीकेंडला ते किती तासांची झोप घेतात. यावर जास्तीत जास्त महिलांनी हे मान्य केलं की, बाळाच्या जन्मानंतर त्यांची झोप कमी झाली.
लोकांच्या प्रतिक्रियांनुसार या रिसर्चमध्ये आढळलं की, पहिल्या बाळाच्या जन्मानंतर मातांच्या झोपेत सरासरीपेक्षा १.७ पॉइंटची कमतरता नोंदवली गेली. बाळाच्या जन्मानंतर प्रत्येक रात्री झोपण्यात ४० मिनिटांची कमतरता आली. त्यासोबतच रिसर्चनुसार, पहिल्या बाळाच्या जन्मानंतर माता प्रत्येक रात्री सरासरी १ तास कमी झोप घेतात. ब्रेस्टफिडींग करणाऱ्या मातांच्या झोपेत फार कमतरता येते. तर पहिल्यांदा बाळाच्या जन्मानंतर पुरूषांची झोपही कमी होते.
या रिसर्चनुसार, पहिल्यांदा पालक झाल्यावर आई-वडील दोघांच्याही झोपेत कमतरता येते आणि ते पूर्ण झोप घेऊ शकत नाहीत. हे तोपर्यंत सुरू असतं जोपर्यंत बाळ ६ वर्षांचं होत नाही.