एखाद्या व्यक्तीप्रमाणे अभिनय करणं वेगळी गोष्ट आहे. पण एखाद्या व्यक्तीप्रमाणे दिसायचं असेल तर, अनेक गोष्टींशी तडजोड करण्यासोबतच फार मेहनतही घ्यावी लागते. आता रणवीर सिंगचंच पाहा ना... सध्या रणवीर त्याचा आगामी चित्रपट '83'च्या चित्रिकरणामध्ये व्यस्त असून आपल्या सर्वांनाच माहित आहे की, या चित्रपटामध्ये तो भारताच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आतापर्यंत आपण रणवीरने साकारलेला बाजीराव, खिलजी चाहत्यांनी डोक्यावर घेतला. त्यासाठी त्याने घेतलेली मेहनतही आपण सर्वांनी पाहिली. कपिल देव यांच्या भूमिकेसाठीही रणवीर प्रचंड मेहनत घेत आहे. एवढंच नाहीतर या भूमिकेसाठी त्याने आपल्या आवडत्या अनेक गोष्टींचा त्यागही केला आहे. आता तुम्ही म्हणाल की, नक्की रणवीर एवढं करतोय तरी काय? रणवीर कपिल देव यांच्याप्रमाणे दिसण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट प्लॅन आणि एक्सरसाइज फॉलो करत आहे.
कपिल देव यांच्याप्रमाणे दिसण्यासाठी रणवीर तासन्तास जिममध्ये एक्सरसाइज करताना दिसतो. एवढंच नाहीतर त्याने आपल्या डाएटमध्येही फार बदल केले आहेत. रणवीरने आपलं फेवरेट चॉकलेट बेस्ड असलेलं न्यूट्रेला खाणंही सोडलं आहे. जाणून घेऊया रणवीर सिंगचा कपिल देव बनण्यापर्यंतचा प्रवास...
स्ट्रिक्ट डाएट आणि एक्सरसाइज
तसं पाहायला गेलं तर रणवीर सिंह एक्सरसाइज लव्हर आहे, परंतु एकाद्या व्यक्तीचा अभिनय रूपेरी पडद्यावर साकारण्यासाठी त्याच्याप्रमाणे दिसणंही गरजेचं आहे. त्यामुळे रणवीरने कपिल देव बनण्यासाठी फक्त आपल्या एक्सरसाइज रूटिनमध्येच बदल केले नाहीत तर आपल्या डाएटमध्येही बदल केले आहेत. रणवीरने त्यांच्याप्रमामे बॉडी तयार करण्यासाठी विशेष ट्रेनिंग घेतली आहे.
हेव्ही प्रोटीन डाएट घेऊन बनला कपिल देव
'83'मध्ये कपिल देव यांच्याप्रमाणे लीन बॉडी मिळवण्यासाठी रणवीरने हेव्ही प्रोटीन डाएटचा सहारा घेतला आहे. नाश्त्यापासून लंच आणि डिनरपर्यंत त्याला फक्त प्रोटीन बेस्ट फूडचं खाण्यास सांगितलं होतं. कपिल देव यांच्याप्रमाणे दिसण्यासाठी रणवीरच्या स्पेशल डाएटमध्ये अंडी, चिकन आणि फिश यांचा समावेश करण्यात आला होता. नाश्त्याच्या सुरुवातीपासूनच तो प्रोटीन डाएट रूटिन फॉलो करत होता. ऑयली फिश, ग्रिल्ड चिकन आणि एग फ्रायसोबतच त्याच्या डाएटमध्ये जवळपास 70 टक्के प्रोटीनचा समावेश होता.
गोड पदार्थ खाणारा रणवीर आता अवोकाडो मूसवर मानतोय समाधान
रणवीरच्या डाएटचा अविभाज्य घटक होता, त्याचं आवडतं डेजर्ट चॉकलेट न्यूट्रेला. परंतु कपिल देव यांच्याप्रमाणे दिसण्यासाठी त्याने सर्वात आधी यांच्यापासून दूर राहण्याचा निश्चय केला. कपिल देव यांच्याप्रमाणे लूक मिळवण्यासाठी आणि डाएट स्ट्रिक्टली फॉलो करावं यासाठी एक नाही तर चार शेफ त्याचं डाएट फऊड तयार करतात. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, हे चारही शेफ लंडनचे असून रणवीरची गोड पदार्थ खाण्याची हौस पूर्ण करण्यासाठी ते त्याला अवोकाडो मूस खाऊ घालतात. यामध्ये डार्क चॉकलेट चिप्स आणि अवोकाडोचा समावेश करण्यात आलेला आहे.
कार्ब्स आणि प्रोटीनचा कॉम्बो
चित्रपटामध्ये कपिल देव यांच्याप्रमाणे लीन बॉडी तयार करणं सोपं नव्हतं. यासाठी जेवढी गरज स्ट्रिक्ट एक्सरसाइजची होती, तेवढीच स्ट्रिक्ट डाएट फॉलो करण्याची होती. यामुळेच प्रोटीन आणि कार्ब्सवर खूप फोकस करण्यात आलं होतं. त्याच्या डाएटमध्ये जलपाइनो आणि क्रिस्प बेकन ऑमलेट, ओट्स, अंडी यासोबत फ्रेश बेरी या फळांचाही समावेश करण्यात आला होता. हे डाएट रणवीरची एनर्जी वाढवण्यासोबतच त्याच्या मसल्स वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.
दरम्यान, या चित्रपटात ताहिर राज भसीन सुनील गावस्करांच्या भूमिकेत, एमी ब्रिक बलविंदर संधूंच्या भूमिकेत, तमीळ अभिनेता जीवा कृष्णामचारी श्रीकांत यांच्या भूमिकेत, चिराग पाटील संदीप पाटील यांच्या भूमिकेत, आदिनाथ कोठारे दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत, धैर्य करवा रवी शास्त्री यांच्या भूमिकेत आणि साहिल खट्टर सैयद यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तसेच हा चित्रपट 10 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. आपली प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.