महाआरोग्य शिबिराअंतर्गत ९५६ नेत्रशस्त्रक्रि यांचे नियोजन मोफत चष्मे वाटप : तात्याराव लहाने करणार शस्त्रक्रिया

By admin | Published: January 31, 2017 02:06 AM2017-01-31T02:06:36+5:302017-01-31T02:06:36+5:30

नाशिक : शहरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये डोळ्यांच्या आजाराकरिता नोंदणी झालेल्या सुमारे सहा हजार २३९ रु ग्णांपैकी शस्त्रक्रियेसाठी संदर्भित केलेल्या ९५६ नेत्रशस्त्रक्रि यांचे तीन टप्प्यांत नियोजन करण्यात आले आहे. या शस्त्रक्रि या ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने करणार आहेत. यावेळी नोंदणीकृत गरजू रु ग्णांना मोफत चष्मे वाटपही करण्यात येणार आहे.

Free spectacles allocated for the operation of 95th ophthalmic surgery under the Medical Camp: Tatyarao will undergo surgery | महाआरोग्य शिबिराअंतर्गत ९५६ नेत्रशस्त्रक्रि यांचे नियोजन मोफत चष्मे वाटप : तात्याराव लहाने करणार शस्त्रक्रिया

महाआरोग्य शिबिराअंतर्गत ९५६ नेत्रशस्त्रक्रि यांचे नियोजन मोफत चष्मे वाटप : तात्याराव लहाने करणार शस्त्रक्रिया

Next
शिक : शहरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये डोळ्यांच्या आजाराकरिता नोंदणी झालेल्या सुमारे सहा हजार २३९ रु ग्णांपैकी शस्त्रक्रियेसाठी संदर्भित केलेल्या ९५६ नेत्रशस्त्रक्रि यांचे तीन टप्प्यांत नियोजन करण्यात आले आहे. या शस्त्रक्रि या ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने करणार आहेत. यावेळी नोंदणीकृत गरजू रु ग्णांना मोफत चष्मे वाटपही करण्यात येणार आहे.
शस्त्रक्रियांच्या प्रथम टप्प्यात ६ फेब्रुवारीला जिल्हा
रु ग्णालय येथे डोळ्यांची फेरतपासणी करून ७, ८ व ९ फेब्रुवारी या तीन दिवसांत नाशिक ग्रामीण व नाशिक शहरातील ३५३ शस्त्रक्रि या करण्याचे नियोजन आहे. दुसर्‍या टप्प्यात इगतपुरी तालुक्यातील एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयात सिन्नर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व नाशिक ग्रामीण (उत्तर) येथील नोंदणीकृत रु ग्णांची २१ फेब्रुवारीला फेरतपासणी करून २२, २३ व २४ फेब्रुवारी रोजी ३४२ रु ग्णांच्या शस्त्रक्रि या करण्यात येतील. तिसर्‍या टप्प्यात मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयत पेठ, सुरगाणा, निफाड, दिंडोरी व नाशिक ग्रामीण (दक्षिण) येथील नोंदणीकृत
रु ग्णांची २ मार्चला फेरतपासणी करून ३, ४ व ५ मार्चला ३६१ रु ग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शस्त्रक्रियांसाठी आवश्यक यंत्रसामुग्री व मनुष्यबळासाठी संबंधित रु ग्णालयांची डॉ. तात्याराव लहाने यांनी समक्ष पहाणी केली. या पहाणी दौर्‍यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. नाईक, रामेश्वर नाईक आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
इन्फो-
वंचित रु ग्णांसाठी फेरतपासणी
मालेगाव येथे ३, ४ व ५ फेबुवारीला वंचित रु ग्णांसाठी उपजिल्हा रु ग्णालयात फेरतपासणी व शस्त्रक्रियेसाठी जे. जे. रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. तसेच ससून
रु ग्णालय पुणे येथील अस्थिरोगतज्ज्ञ, कान, नाक व घसा तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ व शस्त्रक्रिया तज्ज्ञ ४, ५ व ६ फेबुवारीला चांदवड उपजिल्हा रु ग्णालय व जिल्हा सामान्य रु ग्णालय नाशिक येथे उपस्थित राहणार आहेत. यावेळी गुडघा व कंबरेचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. चंदनवाले यांच्यामार्फत विनामूल्य करण्यात येणार आहेत. या माध्यमातून गरजूंनी उपचार करून घ्यावेत, असे आवाहन पालकमंत्री संपर्क कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Web Title: Free spectacles allocated for the operation of 95th ophthalmic surgery under the Medical Camp: Tatyarao will undergo surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.