डेंगू, चिकगुनिया, मलेरियाचे डास पळवण्याचे घरगुती उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 10:53 AM2018-10-09T10:53:44+5:302018-10-09T10:54:02+5:30
वातावरणात बदल झाला की, डेंगूची समस्या डोकं वर काढते. आता जर डेंगू पसरवणाऱ्या डासांमुळेच झिका वायरसही पसरु लागला आहे.
वातावरणात बदल झाला की, डेंगूची समस्या डोकं वर काढते. आता जर डेंगू पसरवणाऱ्या डासांमुळेच झिका वायरसही पसरु लागला आहे. झिका वायरसवर अजून कोणतही ठोस असं औषध मिळालं नाहीये. त्यामुळे या आजारापासून बचाव करण्यासाठी सध्या सर्वात चांगला उपाय म्हणजे घरात डास येऊ न देणे.
पण यासाठी विषारी औषधांचा वापर करुनही तुम्हाला समस्या होऊ शकतात. अशात काही नैसर्गिक उपायांनी डासांना पळवणे फायद्याचे ठरु शकते. हे तुमच्या आरोग्यासाठीही फायद्याचं असेल. आम्ही तुम्हाला काही पर्याय सांगणार आहोत.
लिंबू आणि निलगीरी तेल
लिंबूचं तेल आणि निलगीरी तेलाचं मिश्रण डासांना घरापासून दूर ठेवण्याचा सर्वात चांगला पर्याय मानला जातो. या मिश्रणाबाबत सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की, हा उपाय नैसर्गिक आहे. दोन्ही तेलांचं मिश्रण तुम्ही अंगावर लावू शकता. याने तुम्हाला डास चावणार नाहीत.
पुदीना
जर तुम्हाला असं वाटत असेल की, झाडांमुळे डास जास्त होतात तर तुम्ही चुकीचा विचार करताय. झाडांचं योग्य रोपण केल्यास तुमच्या घरात डास येणार नाही. अंगणात पुदीना, लिंबू, झेंडू, कडूलिंब ही झाडे लावल्यास डास येणार नाहीत.
कडूलिंब
कडूलिंबाचे अनेक फायदे होतात. आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच याने डास पळवण्यासही फायदा होतो. कडूलिंबाचा वास डासांना दूर ठेवतो. कडूलिंबाचं तेल आणि खोबऱ्याचं तेल एकत्र करुन शरीरावर लावा. याने कमीत कमी आठ तास तुमचा डासांपासून बचाव होतो.
कापूर
डासांपासून बचाव करण्यासाठी कापूर फार फायदेशीर आहे. एका खोलीमध्ये कापूर लावून दरवाजे आणि खिडक्या बंद करा. १५ ते २० मिनिटांनी दरवाजे आणि खिडक्या उघडा याने डास पळून जातील.