Hair Loss : आजकाल जास्तीत जास्त लोकांना केसगळतीची समस्या होते. पण अनेकांना माहीत नसतं की, केसगळती होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया सुद्धा आहे. याचा अर्थ प्रत्येकवेळी केसगळती होणं चिंतेची बाब नसते. सामान्यपणे कंगव्याने केस करताना किंवा केस धुताना गळतात. पण जेव्हा केस एकाच भागातून जात्त गळत असतील किंवा टक्कल पडल्यासारखं दिसत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. पण मग केसगळती किती प्रमाणात झाल्यावर चिंतेचं कारण असतं? केसगळती ही एक शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणजे केस गळतात आणि आपोआप नवीन केस येतात.
अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीनुसार, एका व्यक्तीचे दररोज जवळपास ५० ते १०० केस गळणं सामान्य बाब आहे. केसांचे फॉलिकल्स एका प्रोसेसमधून जात असतात. यात पहिली स्टेज एनाजेन असते ज्यात केसांचा विकास होतो आणि त्यानंतर टेलोजेन स्टेज येते ज्याला रेस्ट स्टेजही म्हटली जाते. यात केसगळती सुरू होते. केसांची उगवण्याचं आणि गळण्याचं हे चक्र तोपर्यंत सुरू असतं जोपर्यंत रोम कूप सक्रिय राहतात आणि नवीन केस येत राहतात. सामान्यपणे निरोगी लोकांच्या डोक्यावर ८० हजार ते १२०,००० केस असतात. ज्या लोकांचे केस छोटे असतात त्यांना केसगळतीची समस्या कमी होते. लांब केस असलेल्या लोकांना ही समस्या अधिक असते.
फार जास्त केसगळतीचं कारण
जर तुमचे एका दिवसात १०० पेक्षा जास्त केस गळत असतील तर याचा अर्थ तुमचे केस सामान्यपेक्षा जास्त गळत आहेत. जसजसे केस पातळ होत जातात, ते कमी होत जातात. सामान्यपणे गळणारे केस प्रक्रियेदरम्यान परत येतात. केसगळतीची वेगवेगळी कारणे आहेत. बाळाला जन्म देणे, गर्भनिरोधक गोळ्या बदलणे किंवा बंद करणे, वजन जास्त कमी करणे, ताप किंवा आजार, ऑपरेशननंतर आणि फार जास्त तणाव असला तर केसांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो.