आरोग्यासाठी वरदान आहे जव, रंग उजळवण्यासाठीही फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 09:51 AM2018-10-20T09:51:02+5:302018-10-20T09:51:32+5:30
जव या धान्यातून आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतात. त्यासोबतच जवाच्या मदतीने अनेक रोगांपासूनही बचाव केला जाऊ शकतो.
जव या धान्यातून आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतात. त्यासोबतच जवाच्या मदतीने अनेक रोगांपासूनही बचाव केला जाऊ शकतो. जव ही गव्हाचीच एक प्रजाती आहे. पण जव गव्हाच्या तुलनेत हलकं आणि जाड धान्य आहे. जवामध्ये मुख्यत्वे लेक्टिक अॅसिड, सॅलिसिलीक अॅसिड, फॉस्फोरिक अॅसिड, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम उपलब्ध असतात. चला जाणून घेऊया जवाचे आणखी काही आरोग्यदायी फायदे...
जाडेपणा कमी करण्यासाठी
९५ टक्के लोक जाडेपणाच्या समस्येमुळे हैराण असतात. जवाचे काढ्यात मध मिश्रित करुन प्यायल्यास जाडेपणा कमी करण्यास मदत होते. त्यासोबतच जी व्यक्ती कमजोर आहे, त्या व्यक्तीने जव आणि दुधाची खिर खाल्याने जाड होतात.
रंग उजळतो
जवामुळे केवळ अंतर्गत नाही तर बाह्य रुपालाही फायदा होतो. जव रंग उजळवण्यासाठी वरदान मानलं जातं. जवाचं पिठ, हळद पावडर आणि जवसाचं तेल थोड्या पाण्यात मिश्रित करुन एक पेस्ट तयार करा. रोज शरीराला याला लेप लावल्याने आणि नंतर गरम पाण्याने आंघोळ केल्यास रंग उजळतो.
डायबिटीज करा नियंत्रित
डायबिटीजने अनेकजण त्रस्त असतात. हा आजारा लोकांच्या लाइफस्टाईलवर निर्भर असतो. या आजारावर कोणतीही अॅलोपॅथी औषध काम करत नाही. त्यामुळे या आजाराला दूर ठेवण्यासाठी हेल्दी डाएट घेणे गरजेचे आहे. डायबिटीजचे रुग्ण जवाच्या पिठापासून तयार चपात्या खाऊ शकतात. जवाच्या पिठामध्ये चण्याचं पीठ मिश्रित करुनही खाल्लं जाऊ शकतं.
किडनी स्टोनपासून आराम
खराब आणि दुषित खाण्यापिण्यामुळे अनेकांना किडनी स्टोनच्या समस्येचा सामना करावा लागतो. या आजाराने ग्रस्त लोकांनी जवाचं पाणी उकळून रोज ग्लास प्यावे. असे नियमित केल्याने किडनी स्टोन दूर होतो.