शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचा आमदार ठरणार
3
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
4
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
6
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
7
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
8
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
9
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
10
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
11
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
12
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
14
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
15
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
16
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
17
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
19
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
20
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

सकाळी उठल्यानंतर 'हे' छोटंसं काम करा अन् आरोग्याच्या तक्रारींसाठी सतत दवाखान्यात जाणं टाळा

By manali.bagul | Published: February 01, 2021 9:52 AM

Benefits of drinking water in marathi : अनेकजण पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करून  सरळ नाष्ता करायला बसतात किंवा चहा पितात.

सकाळी उठल्यानंतर निरोगी आणि फिट राहण्यासाठी लोक वेगवेगळ्या  प्रकारच्या उपाायांचा अवलंब करतात. काहीजण बारिक होण्यासाठी सकाळी उठल्यानंतर गरम पाण्याचे सेवन करतात. तर काहीजण व्यायाम करायला जातात. अनियमित जीवनशैलीमुळे अलिकडे सगळ्यांनाच आजारपणाचा सामना करावा लागतो.  सकाळी उठल्यानंतर पाण्याचे सेवन करणं शरीरासाठी चांगलं असतं हे तर तुम्हाला माहितच असेल पण अनेकांना सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते किंवा उठायला उशीर झाल्यानंतर अनेकजण पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करून  सरळ नाष्ता करायला बसतात किंवा चहा पितात. त्यामुळे नकळतपणे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. सकाळी पाणी प्यायल्यानं तुम्ही कसे अधिक निरोगी राहू शकता याबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. 

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गरम पाण्याचे सेवन केल्यानं शरीरातील विषारी बाहेर टाकण्यास मदत होते. शरीर निरोगी राहण्यासाठी रोज  रिकाम्या पोटी पाण्याचे सेवन करायला हवे. अनोशापोटी पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व घाण स्वच्छ होण्यास मदत होते आणि रक्त स्वच्छ होण्यासही मदत होते. त्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिण्यास सुरुवात करा आणि हळूहळू याचं प्रमाण वाढवा. यामुळे त्वचा चमकदार होण्यासही मदत होते.

गॅसची समस्या दूर होते

सकाळी रिकाम्या पोटी पाण्याचे सेवन केल्यानं गॅस, जळजळ, अपचनाची समस्या दूर होते.  जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर अनोशापोटी पाणी पित असाल तर तुम्हाला बद्धकोष्टाच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. सकाळी पोट साफ झाल्यामुळे तुम्ही केलेल्या नाश्त्यातील पूर्ण पोषक तत्व मिळण्यास मदत होते.

वजन नियंत्रणात राहते

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी पाण्याचे सेवन केल्यानं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी पाण्याचे सेवन केल्यानं मेटाबॉलिज्म मजबूत राहते. 

किडनीसंबंधी समस्यांपासून सुटका मिळते

किडनीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी रिकाम्या पोटी पाण्याचे सेवन करायला हवं. त्यामुळे किडनीसंबंधीत समस्यांपासून आराम मिळतो.सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्याने गळा, डोळ्यासह किडनीचं आरोग्यही उत्तम राखण्यास मदत होते. तसेच शरीराच्या अनेक समस्या दूर होतात.कोरोनाचा असाही फायदा! पूर्णपणे नष्ट झाला आहे दरवर्षी लाखोंना त्रास देणारा हा आजार....

मासपेशींसाठी फायदेशीर

सकाळी पाणी प्यायल्यानं शरीरात नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. त्यासाठी रोज रिकाम्या पोटी पाण्याचे सेवन करणं आवश्यक आहे. अंगदुखीचा त्रास कमी होतो. वाढत्या वयात स्वतःला फिट ठेवण्यासाठी धर्मेंद्र करताहेत 'हे' काम; फक्त ३० मिनिटं द्यावी लागणार

 (टिप : वरील सर्व उपाय आम्ही माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWaterपाणीWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स