हिवाळ्यात रिकाम्या पोटी प्या अ‍ॅलोव्हेरा ज्यूस, आरोग्याला मिळणारे फायदे वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 11:00 AM2022-11-29T11:00:13+5:302022-11-29T11:00:36+5:30

Aloe Vera Juice Benefits:  अ‍ॅलोव्हेराची साल काढून गराचे छोटे छोटे तुकडे करा. आता हे तुकडे पाण्यात उकडा. काही वेळ उकडल्यावर अ‍ॅलोव्हेराचे तत्व पाण्यात उतरतील. आता हे पाणी गाळून पिऊन घ्या.

Health benefits of aloe vera juice in winter season | हिवाळ्यात रिकाम्या पोटी प्या अ‍ॅलोव्हेरा ज्यूस, आरोग्याला मिळणारे फायदे वाचून व्हाल अवाक्...

हिवाळ्यात रिकाम्या पोटी प्या अ‍ॅलोव्हेरा ज्यूस, आरोग्याला मिळणारे फायदे वाचून व्हाल अवाक्...

googlenewsNext

Aloe Vera Juice Benefits:  अ‍ॅलोव्हेरामध्ये अनेक औषधी गुण असतात. आरोग्यासाठी अ‍ॅलोव्हेरा फायदेशीर असतं. अ‍ॅलोव्हेराचा ज्यूस प्यायल्याने अनेक आजार दूर करण्यास मदत मिळते. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ, व्हिटॅमिन बी6 आणि व्हिटॅमिन बी12 असतात. सोबतच अ‍ॅलोव्हेरामध्ये सोडियम, आयरन, पोटॅशियम, कॉपर, मॅग्नेशियम, झिंक, क्रोमियम, सेलेनियम आणि कॅल्शियमसारखे मिनरल्स आढळतात. ज्यांचे अनेक फायदे मिळतात. अ‍ॅलोव्हेराचा ज्यूस खासकरून हिवाळ्यात पिणं फार फायदेशीर मानलं जातं. चला जाणून घेऊ याचे फायदे...

कसा कराल ज्यूस तयार

अ‍ॅलोव्हेराची साल काढून गराचे छोटे छोटे तुकडे करा. आता हे तुकडे पाण्यात उकडा. काही वेळ उकडल्यावर अ‍ॅलोव्हेराचे तत्व पाण्यात उतरतील. आता हे पाणी गाळून पिऊन घ्या.

पचनासाठी फायदेशीर

अ‍ॅलोव्हेरा ज्यूस पचनासाठी फार फायदेशीर आहे. यातील पोषक तत्वांमुळे गॅस, अ‍ॅसिडिटी आणि अपचनाची समस्या दूर करतात. जर तुम्हाला मलत्याग करण्यासाठी समस्या होत असेल तर हा ज्यूस नक्की प्यावा.

इम्यूनिटी वाढवा

अ‍ॅलोव्हेरा ज्यूसमध्ये असलेल्या तत्वांमुळे इम्यूनिटी वाढवण्यास मदत मिळते. यात व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. जे आजारांसोबत लढण्यासाठी शक्ती वाढवतात. अ‍ॅलोव्हेरा ज्यूस प्यायल्याने सर्दी-खोकल्याची समस्या दूर होते.

वजन कमी करा

अ‍ॅलोव्हेरामध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतात. अ‍ॅलोव्हेरा ज्यूस प्यायल्याने भरपूर एनर्जी मिळते. या ज्यूसमुळे मेटाबॉलिज्म चांगलं होतं. याने वजन कमी करण्यास मदत मिळते.

त्वचेसाठी फायदेशीर

अ‍ॅलोव्हेरा केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर असतं. अ‍ॅलोव्हेरामध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी असतं. ज्याने त्वचेला फायदा मिळतो. अॅलोव्हेरा ज्यूस प्यायल्याने पिंपल्स, रिंकल्स आणि ड्राईनेससारख्या अनेक समस्या दूर होतात.

Web Title: Health benefits of aloe vera juice in winter season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.