गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून जगभरासह भारतातही कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. कोरोनाच्या प्रसाराबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. जसजसा कोरोनाचा प्रसार वाढत गेला तसतसं कोरोनाच्या लक्षणांमध्येही बदल होत गेले. त्यापैकी एक म्हणजे कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर नाकाला विशिष्ट प्रकारच्या संवेदना जाणवतात याबाबत आज माहिती देणार आहोत. हळूहळू जसजसे लोक घराबाहेर पडत आहेत तसतसे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. नाकातून पाणी वाहणं आणि नाक पूर्णपणे बंद होणं अशा अनेक लक्षणांचा सामना कोरोना रुग्णांना करावा लागत आहे. अनेकांना नाक बंद होण्याची लक्षणं जाणवल्यानंतर त्यांनी फ्लू किंवा कॉमन कोल्ड समजून आजाराकडे दुर्लक्ष करण्याची चूक केली.
कोरोना आहे की नाही कसं लक्षात येणार
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार सामान्य, सर्दी, कॉमन कोल्ड आणि कोरोना यांतील फरक ओळखणं खूप कठीण आहे. कारण नाक बंद होणं किंवा नाक वाहणं ही लक्षणं साध्या आजारातही दिसून येतात. श्वास घ्यायला त्रास होत असेल, वासही येत नसून ही समस्या दिवसेंदिवस वाढत असेल तर गांभिर्याने घ्यायला हवं. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार ताप आणि सुका खोकला कोरोनाची प्रमुख लक्षणं आहेत. नाक गळणं आणि नाक बंद होणं या लक्षणांचा समावेश नाही. कोरोना व्हायरस जास्त प्रमाणात पसरत राहिला तर, आपल्याला सर्दी किंवा फ्लूयांसारखी वाटणारी लक्षणे (वाहती नाक आणि बंद नाक) कोविड १९ चीही असू शकतात.
कसा कराल बचाव?
कोणतीही लस नसतानाही कोरोनापासून बचाव करणं शक्य आहे. त्यासाठी योग्य उपाययोजना करायला हव्यात. मास्कचा वापर करणं, सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणं गरजेचं आहे. कोविड -१९ हा श्वसनाच्या आजारांसाठी कारणीभूत ठरत असल्याचा विचार केला जात होता, परंतु आता अनेक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, डोके-पायाच्या पायापासून शरीराच्या अनेक भागावर परिणाम करते. त्यासाठी लक्षणं दिसत असल्यास स्वतःला क्वारंटाईन करणं, लक्षणांबाबत जागरूक असणं गरजेचं आहे.
'या' तीन कारणांनी श्वास घेण्यास होते समस्या
श्वासनलिकेत सूज, इन्फेक्शन किंवा कोणत्याही इतर कारणाने जेव्हा ऑक्सिजन पुऱेशा प्रमाणात शरीरात प्रवेश करत नाही. तेव्हा तुम्हाला छोटे श्वास घ्यावे लागतात. म्हणजे जेव्हा तुम्ही आधीसारखा मोठा श्वास घेत होते त्यातुलनेत तुमच्या श्वासांचा कालावधी छोटा होऊ लागतो. ही समस्या जर फार जास्त काळापासून सुरू असेल तर अस्थमा, निमोनिया किंवा क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीजचं(सीओपीडी)ची लक्षणे असू शकतात. खुशखबर! कॅन्सरच्या उपचारांसाठी भारतीय वैज्ञानिकांनी तयार केलं अनोखं 'बँडेज', तज्ज्ञांचा दावा
जे लोक फार जास्त तणावात राहतात त्यांनाही श्वास घेण्याची समस्या होऊ शकते. ते एकतर फार लवकर लवकर श्वास घेतात किंवा छातीत जडपणा जाणवत असल्या कारणाने त्यांची श्वास घेण्याची गती हळूवार होते. या दोनही स्थितीत त्यांचं घेण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे त्यांच्या फुप्फुसांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही आणि त्यांना श्वास घेण्यास अडचण येते. आयएमएने कोरोना उपचारांबाबत पुरावे मागिल्यानंतर, अखेर आरोग्य मंत्रालयाकडून खुलासा
ज्या लोकांचं वजन जास्त असतं त्यांनाही श्वास घेण्यास समस्या होऊ शकते. कारण अशा लोकांना दम लवकर लागतो. दम लागल्या कारणाने ब्रिदींग पॅटर्न डिस्टर्ब होतं आणि फुप्फुसात पुरेसा ऑक्सिजन सप्लाय होऊ शकत नाही. फेलूदा स्ट्रिप टेस्ट आणि लसीचा वापर भारतात कधी होणार?, अखेर आरोग्यमंत्र्यानी केला खुलासा