HEALTH : वयाच्या तिशीनंतर या बदलांकडे करु नका दुर्लक्ष !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2017 10:40 AM2017-01-31T10:40:18+5:302017-01-31T16:22:23+5:30

महिलांप्रमाणे पुरुषांचेही वयोमानानुसार शरीरात काही बदल घडत असतात. काही लोक या बदलांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते.

HEALTH: Do not ignore these changes after three years of age! | HEALTH : वयाच्या तिशीनंतर या बदलांकडे करु नका दुर्लक्ष !

HEALTH : वयाच्या तिशीनंतर या बदलांकडे करु नका दुर्लक्ष !

Next
ong>-Ravindra More

महिलांप्रमाणे पुरुषांचेही वयोमानानुसार शरीरात काही बदल घडत असतात. काही लोक या बदलांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र योगा आणि नियमित व्यायाम केल्याने या समस्यांपासून आराम मिळू शकतो. नेमके वयाच्या तिशीनंतर कोणते बदल घडतात याबाबत जाणून घेऊया. 

* तिशीनंतर बऱ्याच पुरुषांत प्रोस्टेट कॅन्सरचा धोका संभवतो. यात लघवी करतेवेळी त्रास होणे, रात्री जास्त लघवी येणे आदी समस्या निर्माण होतात. जर ही लक्षणे आढळत असतील तर याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांना भेटावे.

* तिशीनंतर बऱ्याच पुरुषांची पचनसंस्था बिघडते ज्यामुळे जेवण व्यवस्थित पचत नाही. सोबतच शरीरातील कॅलरी बर्न होण्याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे लठ्ठपणा येतो. यासाठी रोजच व्यायाम करावा आणि फास्ट फूडचे सेवन टाळावे. 

* पुरुषांत वयाच्या तिशीनंतर मांसपेशी संकुचित होण्यास सुरुवात होते. त्यांच्यातील लवचिकता कमी होते. यामुळे मांसपेशी दुखण्याच्या समस्या निर्माण होतात. यासाठी आतापासून योगा आणि व्यायाम केल्यास ही समस्या उद्भवणार नाही.

* वयासोबतच हाडे कमजोर होऊ लागतात. यासाठी अगोदरपासूनच आहारात कॅल्शियम आणि विटॅमिन डीचे प्रमाण भरपूर असावे. शिवाय शरीराचे वेळोवेळी चेकअप करावे.

* लठ्ठपणामुळे शरीरात बॅड कॅलेस्ट्रॉल जमा होऊ लागतोे, यामुळे ह्रदयासंबंधी समस्या निर्माण होऊ लागतात. यासोबतच उच्च रक्तदाबची समस्याही निर्माण होते. 

* तिशीनंतर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन कमी होेते. हा सेक्स हार्मोन असतो. यामुळे पुरुषांमध्ये तणाव निर्माण होतो. 

Web Title: HEALTH: Do not ignore these changes after three years of age!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.