HEALTH : घोरण्याची समस्या सतावतेय? करा घरीच उपाय !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2017 10:32 AM2017-01-31T10:32:05+5:302017-01-31T16:22:39+5:30
घोरणाऱ्या व्यक्तीजवळ झोपणाऱ्याचीही झोप मोड तर होते, शिवाय स्वत:चीही झोप पूर्ण होत नाही. आपणही या समस्येने त्रस्त असाल तर खालील घरगुती उपाय करुन सुटका मिळवू शकता.
Next
जास्त थकवा किंवा बंद नाकामुळे घोरण्याची समस्या उद्भवते. अशात घोरणाऱ्या व्यक्तीजवळ झोपणाऱ्याचीही झोप मोड तर होते, शिवाय स्वत:चीही झोप पूर्ण होत नाही. आपणही या समस्येने त्रस्त असाल तर खालील घरगुती उपाय करुन सुटका मिळवू शकता.
* झोपण्याअगोदर पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब टाकून गुळण्या करा. असे केल्याने नाकाच्या छिद्रांची सूज कमी होते आणि श्वास घेण्यास अडचणी येत नाही. आपण नाकाजवळ पुदिनाचे तेल लावूनही झोपू शकता.
* आॅलिव्ह आॅइल मधील असलेले तत्व श्वासातील समस्या दूर करतात. यामुळे रात्री झोपण्याअगोदर मधासोबत या तेलाचे सेवन केल्यास फायदेशीर ठरते.
* तूपदेखील घोरण्याच्या समस्येवर रामबाण उपाय मानला जातो. रात्री झोपण्याअगोदर तुपाला थोडे गरम करा आणि ड्रॉपरच्या साह्याने त्याचे एक-दोन थेंब नाकात टाका. असे रोज केल्याने घोरण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. हा सर्वात सोपा उपाय आहे.
* नाक बंद झाल्याकारणाने जर घोरण्याची समस्या निर्माण झाली असेल तर पाण्यात ट्री आॅइलचे काही थेंब टाकून दहा मिनिटासाठी वाफ घ्या. यामुळे नाक मोकळे होईल.
* रोज झोपण्याअगोदर कोमट पाण्यात इलायची किंवा त्याची पावडर मिक्स करुन प्या. असे रोज केल्याने घोरण्याची समस्या दूर होते.
* हळदीला बऱ्याच समस्यांचा रामबाण उपाय मानले जाते. रोज रात्री झोपण्याच्या अधार्तास अगोदर हळद मिक्स केलेले दूध प्यावे. यामुळे घोरण्याची समस्या दूर होते.
* घोरण्याच्या समस्येवर मध देखील चांगला उपाय आहे. यासाठी रोज कोमट पाण्यात मध मिक्स करुन प्यावे. यामुळे श्वासासंबंधी असलेल्या समस्यांपासून आराम मिळतो.