जीवघेणं ठरू शकतं डिहायड्रेशनच्या समस्येकडे दुर्लक्ष करणं; आजंच जाणून घ्या सोपे उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 11:04 AM2020-06-10T11:04:35+5:302020-06-10T11:09:33+5:30
शरीरातील तापमान सामान्य ठेवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर डिडायड्रेशनचा धोका वाढू शकतो.
सध्या पावसाला सुरूवात झाली आहे. तरी ऊन तर कधी पाऊन असे बदल वातावरणात दिसून येत आहेत. दमट हवामामुळे लोकांमध्ये डिहायड्रेशनची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहे. यात घाबरण्यासारखं काही नाही पण दुर्लक्ष केल्यास शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला डिहायड्रेशनचे दुष्परिणाम तसंच शरीराला डिहायड्रेट होण्यापासून कसं वाचवता येईल याबाबत सांगणार आहोत.
डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याची कमतरता :
शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळे ही स्थिती उद्भवते. घामाद्वारे, मुत्राद्वारे, मलाद्वारे शरीरातून पाणी बाहेर येत असते. शरीरातील तापमान सामान्य ठेवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर डिडायड्रेशनचा धोका वाढू शकतो.
डिहायड्रशेन झाल्यास वेळेवर वेळेवर औषधं न घेतल्यास हीट स्ट्रोकचा धोका असतो. गंभीर स्थितीत मृत्यूचा सामनाही करावा लाागू शकतो. शरीरातील काही लक्षणांकडे लक्ष देणं गरजेंच आहे. डोळ्यांसमोर अंधार येणं, सतत चक्कर येणं ही डी हायड्रेशनची लक्षणं आहेत.
शरीरात योग्य प्रमाणात पाणी नसेल तर त्वचा कोरडी पडते. ओठ फाटायला सुरूवात होते. कमीत कमी ४ तासांच्या आत तुम्ही लघवी करण्यास जायला हवं. लघवीला न गेल्यास ही डिहाड्रेशनची समस्या असू शकते. महिलांनी कमीत कमी २.५ लीटर आणि पुरूषांनी ३ लीटर पाणी कमीतकमी प्यायला हवं. ३ ते ४ बाटल्या पाणी प्यायल्याने तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं.
जर तुम्हाला सतत तहान लागल्यासारखे वाटत नसेल तर तुम्ही पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करत असाल. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी द्रवपदार्थांचे सेवन करायला हवं. डिहायड्रेशन असलेल्या व्यक्तींनी लिंबू पाणी, नारळपाणी, ताक या पदार्थांचे सेवन करायला हवे. जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर १५ ते २० मिनिटांनंतर सेवन करणं गरजेचं आहे. डिहाड्रेशनची समस्या उद्भवल्यास सगळ्यात आधी दिर्घ श्वास घ्या. शरीराला आराम द्या.
माऊथवॉशचा वापर करा; कोरोनाचा संसर्ग टाळा
भारताने शोधले कोरोनाचे उपचार; 'या' औषधांनी बरे होत आहेत रुग्ण, आईसीएमआरची परवानगी