लंडन - डायबिडीसची समस्या आजच्या काळात सामान्य झाली आहे. त्याचे मुख्य कारण चुकीचे खान-पान आणि लाईफस्टाईल आहे. डायबिटीसची समस्या निर्माण झाल्याने शरीरातील रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढू लागते. अशा परस्थितीत ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी डाएटमध्ये काही विशिष्ट्य पदार्थांचा समावेश करणे आवश्यक ठरते. दरम्यान, आता आहारतज्ज्ञांनी डायबिटिसच्या रुग्णांना एका विशिष्ट्य फळाचा रस प्राशन करण्याचा सल्ला दिला आहे. हा ज्युस प्राशन केल्यावर शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करता येऊ शकेल.
डायबिटिसचे तीन प्रकार आहेत. त्यात टाइप-१ डायबिटिस, टाइप-२ डायबिटिस आणि जेस्टेशनल डायबिटिस (गरोदरपणात होणारी हाय ब्लड शुगरची समस्या) यांचा समावेश होतो. दरम्यान, टाइप २ डायबिटिसमध्ये तुमच्या खानपानाची भूमिका महत्त्वाची ठरते. दरम्यान, न्यूट्रिशन रॉब हॉब्सन यांनी सांगतले की, डाळींबाचा रस हा केवळ तीन तासांमध्ये ब्लड शुगर लेव्हल कमी करू शकते. मात्र अद्यापही त्याबाबत पूर्णपणे माहिती समोर आलेली नाही. रॉब हॉब्सन यांनी सांगितले की, डाळिंबाच्या रसामध्ये उच्च प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असते. तसेच यामध्ये ग्रीन टीच्या तुलनेत तीन पट अधिक अँटीऑक्सिडेंट असते.
रॉब हॉब्सन यांनी सांगितले की, हे अँटिऑक्सिडेंट मुख्यत्वेकरून फ्लेवोनॉईड असतात. तसेच त्यामध्ये अजूनसुद्धा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असतो. मात्र असे वाटते की, यामध्ये अँथोसानिन असते जे याला लाल रंग देते. रॉब हॉब्सन यांनी सांगितले की, रिसर्चरच्या मते हे अँटीऑक्सिडेंट कुठे ना कुठे सारखेसोबत जोडले जातात आणि इन्शुलिन लेव्हल अधिक प्रभाव टाकण्यापासून वाचवू शकतात.