हार्ट अटॅक (Heart Attack) किंवा स्ट्रोकचा (Stroke) धोका कमी करण्यासाठी तज्ज्ञ नेहमीच हिरव्या भाज्या (Green Vegetable) खाण्याचा सल्ला देत असतात. पण केवळ हिरव्या भाज्या खाऊन हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी केला जाऊ शकत नाही. हे आमचं नाही तर एका रिसर्चचं मत आहे. तरीही हे सर्वांनाच माहीत आहे की, हिरव्या भाज्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत. असं मानलं जातं की, हिरव्या भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात, जे वेगवेगळ्या आजारांपासून आपला बचाव करतात. मात्र, एका रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, फक्त हिरव्या भाज्या खाऊनच हार्ट स्ट्रोकचा धोका कमी केला जाऊ शकत नाही.
वैज्ञानिकांचं मत आहे की, आपण काय खातो? किती व्यायाम करतो आणि कुठे राहतो? याचा प्रभाव आपल्या लाइफस्टाईलवर पडत असतो. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर आपणं संतुलित आहार घेतला तर कॅन्सरसहीत अनेक मोठ्या आजारांचा धोका कमी केला जाऊ शकतो.
कसा केला रिसर्च?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑक्सफोर्ड आणि ब्रिस्टल विश्वविद्यालय व हॉंगकॉंगच्या चीनी विश्वविद्यालयाने यूके बायोबॅंकच्या रिसर्चमध्ये सहभागी जवळपास ४ लाख लोकांना त्यांच्या आहाराबाबत जाणून घेण्यासाठी एक प्रश्नावली भरण्यास सांगितली होती. ज्यात ते रोज किती प्रमाणात शिजलेल्या आणि कच्च्या भाज्यांचं सेवन करतात? विचारलं होतं. यात बऱ्याच लोकांनी असं उत्तर दिलं की, ते रोज दोन चमचे कच्च्या भाज्या आणि ३ चमचे शिजलेल्या भाज्यांचं सेवन करतात. म्हणजे ती दिवसभरात एकूण ५ चमचे भाज्यांचं सेवन अधिक करतात. त्यांना हार्टसंबंधी आजाराने मृत्यूचा धोका १५ टक्के कमी असतो.
लोकांच्या सवयींबाबतही घेतली माहिती
रिपोर्ट्सनुसार, या रिसर्चमध्ये लोकांच्या लाइफस्टाईलबाबतही जाणून घेण्यात आलं. उदाहरणार्थ त्यांनी धुम्रपान केलं होतं का? किंवा त्यांनी मद्यसेवन केलं होतं का? रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, त्यांच्या रिसर्चमध्ये याबाबत काहीच प्रमाण मिळालं नाही की, फक्त भाज्या खाऊन हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी केला जाऊ शकतो.