भेसळयुक्त हिंग आरोग्यासाठी ठरू शकतो नुकसानकारक, चांगल्या हिंगाची ओळख कशी पटवाल?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 11:37 AM2022-06-21T11:37:45+5:302022-06-21T11:37:52+5:30
How to Check Adulteration in Hing : हिंग आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्यामुळे बाजारात भेसळयुक्त हिंगही मिळू लागला आहे. मग याची ओळख कशी पटवायची? तर यासाठीच आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.
How to Check Adulteration in Hing : कोणत्याही पदार्थाची टेस्ट वाढवण्यासाठी हिंग टाकणं गरजेचं मानलं जातं. चिमुटभर हिंगाचा मोठा प्रभाव बघायला मिळतो. टेस्ट आणि सुगंधासाठी हिंग भाज्यांमध्ये टाकला जातो. पण बाजारात फेक हिंग सुद्धा मिळू लागला आहे. हिंग आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्यामुळे बाजारात भेसळयुक्त हिंगही मिळू लागला आहे. मग याची ओळख कशी पटवायची? तर यासाठीच आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.
गरम करून बघा
हिंग असली आहे की नकली हे ओळखण्याची एक सोपी पद्धत म्हणजे हींग गरम करून बघा. एक चमका हिंग घ्या आणि चमचा मेणबत्तीच्या आगीवर धरा. तुम्ही दोन गोष्टी दिसतील, जर हिंगात कोणतीही भेसळ नसेल तर तो कापूरासारखा जळताना दिसेल. हिंगात भेसळ असेल तर त्यातून काहीच जळताना दिसणार नाही.
हिंगात साबण किंवा दगड
अनेकदा हिंगात साबण किंवा दगडांची भेसळ केली जाते. ही भेसळ ओळखण्यासाठी एक चमचा हिंग एक ग्लास पाण्यात मिक्स करा. काही वेळ हिंग ग्लासात तसाच राहू द्या. भेसळयुक्त हिंगातील साबणाचे आणि दगडांचे कण ग्लासमध्ये खाली दिसू लागतात. जर हिंगात भेसळ नसेल तर काहीच दिसणार नाही.
रंगावरून ओळखा
हिंगाचा रंग बघूनही तुम्ही याची ओळख पटवू शकता. चांगल्या हिंगाचा रंग हलका भुरका असतो आणि भेसळयुक्त हिंगाचा रंग वेगळा दिसतो. त्यामुळे रंग पाहूनही तुम्ही हिंग खरेदी करू शकता.
सुगंधावरून ओळखा
हिंगाचा सुगंध डार्क असतो आणि हिंग हाती घेतल्यावर साबणाने हात धुवूनही त्याचा सुगंध जात नाही. तेच भेसळयुक्त हिंगाचा सुगंध हात धुतला की निघून जातो.