डायबिटीस या आजाराचा समावेश क्रोनिक डिसीजमध्ये समावेश होतो. हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवून तुम्ही या आजाराला नियंत्रणात ठेवू शकता. चांगली जीवनशैली आणि नियमीतता यांमुळे या आजाराला वाढण्यापासून रोखता येऊ शकतं. हा आजार सातत्यानं अनेकांना उद्भवतो. डायबिटीज टाईप २ आणि टाईप १ यांतील फरक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
टाईप १
टाईम्स ऑफ इंडीयाच्या एका रिपोर्टनुसार टाईप १ डायबिटीज हा लहान हा आजार लहान मुलांमध्येही आढळतो. या आजारात इन्सुलिनची निर्मिती व्यवस्थित होत नाही. बाहेरून इन्जेक्शन्स घ्यावे लागतात. १५ ते २५ या वयातील मुलांना हा डायबिटीस झाल्याचे आढळून येते.
टाईप २
वयोवृद्धांसह तरूणांमध्येही टाइप २ डायबिटीसचा धोका अधिक वाढतो आहे. टाइप २ डायबिटीसने पीडित लोक इन्सुलिन रेजिस्टेंस नावाच्या एका स्थितीने पीडित होतात. म्हणजे त्यांच्या शरीरात इन्सुलिन तर तयार होतं, पण शरीर ग्लूकोजला पेशींमध्ये पोहोचवण्यात याचा योग्यप्रकारे वापर करू शकत नाही. यामुळे रक्तात ग्लूकोजचं प्रमाण वाढतं. याचा परिणाम असा होतो की, याच्याशी लढा देण्यासाठी पेन्क्रियाजला आणखी जास्त इन्सुलिन तयार करावं लागतं. या कारणाने पेन्क्रियाजवर जास्त दबाव पडतो. त्यामुळे पेन्क्रियाज ब्लड ग्लूकोजचं प्रमाण सामान्य ठेवण्यसाठी इन्सुलिनची निर्मिती करू शकत नाही.
टाईप २ चे टाईप १ मध्ये रुपांतर होऊ शकतं का?
डायबिटीस टाईप २ चे टाईप १ मध्ये रुपांतर होऊ शकतं असं वाटणं सहाजिक आहे. अशी स्थिती उद्भवणं अनेकदा शक्य नसतं. जरी लक्षणं समान असली तरी हे आजार एकमेकांपासून वेगळे आहेत. टाईप १ डायबिटीसचा ऑटोइम्यून आजारांमध्ये समावेश होतो. ज्यामुळे शरीरातील निरोगी पेशींवर परिणाम होऊन संख्या कमी होते. अनुवांशिकतेनं किंवा इतर कारणांमुळे उद्भवतो. या आजारानेग्रस्त असलेल्या लोकांना इन्जेक्शन्स घ्यावीच लागतात. त्याशिवाय कोणता पर्याय नसतो.
याऊलट डायबिटीस टाईप 2 चुकीच्या जीवनशैलीमुळे उद्भवतो. सकारात्मक जीवनशैली, चांगली राहणीमान, व्यायाम, संतुलित आहार, वेळोवेळी वैद्यकिय तपासणी करणं यांमुळे तुम्ही हा आजार नियंत्रणात ठेवू शकता. डायबिटीस टाईप २ चे टाईप १ मध्ये रुपांतर होणे शक्य नसते.
हे पण वाचा-
पोटाच्या रोजच्या तक्रारी ठरू शकतात IBD समस्येचं कारण; वाचा लक्षणं आणि उपाय
भय इथले संपत नाही! चीनमध्ये नव्या माहामारीचा शिरकाव; आत्तापर्यंत हजारो लोकांना संसर्ग
तुम्हालाही अचानक BP चा त्रास होतो? तज्ज्ञांनी सांगितले 'बीपी' नियंत्रणात ठेवण्याचे सोपे उपाय
भारतातही कोरोनाची लस मोफत मिळणार? अमेरिकेने केली मोठी घोषणा
आरोग्यदायी दुधीच्या सालीचे 'हे' फायदे वाचाल; तर फेकून देताना १० वेळा विचार कराल