दरवर्षी वातावरणातील बदलांमुळे म्हणजेच पावसाळा ते हिवाळा, हिवाळ्यानंतर उन्हाळा या कालावधीत आरोग्यावर परिणाम होऊन वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. सध्या कोरोनाची माहामारी असल्यामुळे आजारी पडण्याची भीती लोकांच्या मनात आहे. ताप, सर्दी किंवा खोकला ही कोरोना संसर्ग झाल्याची सुरूवातीची लक्षणं आहेत. लॉकडाऊनमध्ये सतत घरी बसल्यानं व्हिटामीन डी च्या कमतरतेनं अनेकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली आहे. असं एका रिसर्चमधून स्पष्ट झालं आहे.
कोणत्याही आजारांची धास्ती न घेता घरगुती उपाय करून तुम्ही या आजारांपासून स्वतःला लांब ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला सर्दी, खोकल्यापासून दूर राहण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांनी तुम्ही स्वतःला नेहमी निरोगी ठेवू शकता. कारण खोकल्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या आजारात रुपांतर होऊ शकतं. म्हणून आजारांवर वेळीच उपचार केल्यास आरोग्याला धोका उद्भवणार नाही.
मध
नियमित दोन चमचे मध खाल्ल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. मधामध्ये अॅन्टी मायक्रोव्हियल गुण असल्यानं यामुळे संसर्ग पसरवणाऱ्या जिवाणूंचाही खात्मा होतो. तुम्ही दूधात मध घालूनही सेवन करू शकता. मधामध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टी-बॅक्टेरियल, अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टी-फंगल गुणधर्म असतात आणि दूधामध्ये कॅल्शिअम असतं. त्याचबरोबर दूधामध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि डी, प्रोटीन आणि लॅक्टिक अॅसिडदेखील मुबलक प्रमाणात असतं. जे शरीराला कॅल्शिअमची कमतरता भासू देत नाहीत. हाडं आणि दातांच्या मजबुतीसाठी हे फायदेशीर ठरतं.
काळी मिरी
खोकल्याचा त्रास होत असल्यास काळी मिरी आणि खडीसाखर योग्य प्रमाणात वाटून घ्या. त्यामध्ये तूप घालून त्याच्या लहान गोळ्या बनवा. दिवसातून ३ ते ४ वेळा गोळी चोखल्यास, तुमचा कफ असलेला खोकला निघून जाण्यास मदत होईल.
हळद
हळदीच्या दूधाचे अनेक फायदे आहेत. असं म्हटलं जातं की, यामुळे सर्दी, खोकला आणि जखम लगेच भरून निघते. एवढचं नाहीतर शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं. दूध आणि हळद यामुळे आपल्या शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. या व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास जास्त जाणवतो अशा लोकांनी हळदीच्या दुधाचं सेवन करणं गरजेचं आहे.
सर्दी, खोकला आणि घशात होत असलेल्या खवखवीसाठी हळदीचं दूध उत्तम ठरत असतं. रोज रात्री झोपण्याआधी हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने शरीर चांगले राहते. हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतो. तसेच रक्त अधिक पातळ करण्यास मदत करते. शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो.
तुळस
तुळशीची पानं, आलं आणि जेष्ठमध बारिक करून त्यामध्ये मध एकत्र करून खा. त्यामुळे ताप, डोकेदुखी, घशात होणारी खवखव, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या दूर होतात. तुळशीच्या पानांच्या अर्कात मध एकत्र करून प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होते. त्याचबरोबर क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, अस्थमा यांसारख्या श्वासाशी निगडीत आजारांवरही फायदेशीर ठरतो.
सगळ्यात आधी दिड ग्लास दूध उकळून घ्या उकळलेल्या दुधात ८ ते १० तुळशीची पानं घाला. हवं तर तुम्ही या दुधात हळद किंवा मध घालू शकता. दूध पूर्णपणे उकळल्यानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर या दुधाचे सेवन करा. तुळशीच्या दुधाच्या सेवनाने मायग्रेनची किंवा खोकल्याची समस्या दूर होते.
हे पण वाचा-
CoronaVirus: हिवाळ्यात कोरोना हाहाकार माजवणार, मृत्यूचे प्रमाणही वाढेल, WHOचा गंभीर इशारा
काळजी वाढली! कोविड १९ च्या लक्षणांबाबत WHO नं दिली सूचना; जाणून घ्या काय म्हणाले तज्ज्ञ