मक्याच्या चमकदार धाग्याचे 'हे' फायदे वाचाल तर फेकण्याआधी १० वेळा विचार कराल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 03:34 PM2020-09-09T15:34:29+5:302020-09-09T16:01:48+5:30
आज आम्ही तुम्हाला मक्याच्या धाग्याचे फायदे सांगणार आहोत. हे फायदे वाचून तुम्ही मक्याचे चमकार धागे फेकण्याचा विचार करणं सोडून द्याल .
पावसाळ्यात मका मोठ्या प्रमाणावर बाजारात अपलब्ध असतो. इतर कोणत्याही ऋतूत तुम्ही मका खात असाल तरी पावसाळ्यातील फ्रेश मक्याचा कणीस खाण्याची मजा काही वेगळीच आहे. मक्याचे अनेक पदार्थ घराघरात तयार केले जातात. कोणाला भाजलेला लिंबू लावलेला मका खायला आवडतं तर कोणाला मक्याचे दाणे उकळून किंवा त्याची भजी करून, पिज्जामध्ये खायला आवडतं. पण मका खाताना त्यातील चमकदार बारीक धाग्यांकडे मात्र सगळेच दुर्लक्ष करतात. मक्याच्या सालीसह हे धागेही कचरा म्हणून फेकले जातात. या मुलायम आणि चमकदार धाग्यांना कॉर्न सिल्क म्हटलं जातं.
कॉर्न सिल्कमध्ये स्टग्मास्टरोल आणि सिटेस्टेरोल तत्त्व असतात. हे हृदयरोग आणि कोलेस्ट्रॉलपासून बचाव करण्यासाठी फारच प्रभावीपणे काम करतात. तसेच याने शरीरात ग्लूकोजचं प्रमाणही नियंत्रित राहतं. आज आम्ही तुम्हाला मक्याच्या धाग्याचे फायदे सांगणार आहोत. हे फायदे वाचून तुम्ही मक्याचे चमकार धागे फेकण्याचा विचार करणं सोडून द्याल .
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
कॉर्न सिल्कमध्ये कॅलरी कमी असतात, ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते. यापासून तयार चहा सेवन केल्याने पोट भरलेलं राहतं आणि याने शरीर डिटॉक्स होण्यासही मदत मिळते.
त्वचेच्या समस्या दूर होतात
कॉर्न सिल्कने त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात. खरचटणे, पिंपल्स, खाज, किटक चावणे यापासून आराम मिळतो. यातील अॅंटीबॅक्टेरिअल आणि अॅंटी सेप्टीक गुण त्वचेची रक्षा करतात.
व्हिटामीन सी
जे मक्याचे धागे आपण न वापरता फेकून देतो, त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असत. हे एक चांगलं अॅंटी-ऑक्सिडेंट आहे आणि कार्डियोवस्कुलर रोगापासून याने बचाव होण्यास मदत मिळते. तसेच याने शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा चांगला होतो.
किडनीची समस्या दूर होते
किडनीच्या समस्येवर घरगुती उपाय करायचा असेल तर कॉर्न सिल्कचा वापर करू शकता. याने यूटीआय, ब्लेडर, इन्फेक्शन, किडनी स्टोन, यूरिनरी सिस्टममध्ये सूज येणे अशा समस्या दूर करण्यास मदत मिळते.
पचनक्रिया चांगली राहते.
कॉर्न सिल्कने व्यक्तीची पचनक्रिया चांगली राहते. काही रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, मक्याचे हे धागे लिवर द्वारे बाइल सेक्रेशनला वाढवतात. बाइल गालब्लेडरमध्ये एकत्र होतात, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचन होतं.
किडनीची समस्या दूर होते
किडनीच्या समस्येवर घरगुती उपाय करायचा असेल तर कॉर्न सिल्कचा वापर करू शकता. याने यूटीआय, ब्लेडर, इन्फेक्शन, किडनी स्टोन, यूरिनरी सिस्टममध्ये सूज येणे अशा समस्या दूर करण्यास मदत मिळते.
असा तयार करा चहा
मक्याचे धागे तसेच खाण्याची कोणतीही पद्धत नाहीये. तुम्ही याचं सेवन चहाच्या रूपात करू शकता. एका भांड्यात पाणी उकडा आणि त्यात ताजे कॉर्न सिल्क टाका. काही मिनिटे हे उकडू द्या आणि थंड होऊ द्या. काही वेळाने या चहाला भुरका रंग येईल. त्यानंतर हा चहा गाळून घ्या. याची टेस्ट चांगली करण्यासाठी तुम्ही यात लिंबाचा रसही घालू शकता.
हे पण वाचा-
अरे व्वा! तिन्ही 'मेड इन इंडिया' कोरोना लसींचा पहिला टप्पा यशस्वी; लवकरच लस येणार
तरूणांमध्ये वाढतोय 'कोलोरेक्टल कॅन्सर'चा धोका; वेळीच जाणून घ्या लक्षणं आणि कारणं