सध्याच्या वातावरणात धूळ, प्रदूषण, वातावरणातील बदल यांमुळे अनेकांना श्वसनासंबंधी समस्या उद्भवतात. या समस्यांकडे दूर्लक्ष केल्यानं नकळतपणे आजारात रुपांतर होतं. फुफ्फुसांच्या आजारांपासून लांब राहण्यासाठी सगळ्यांनीच विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. पण सतत कामात व्यस्त असल्यानं किंवा खाण्यापिण्याकडे नीट लक्ष न दिल्यास समस्यांचा सामना करावा लागू शकतो. फुफ्फुसांचा कॅन्सर किंवा फुफ्फुसांचा कोणताही आजार उद्भवू नये म्हणून कशी काळजी घ्यायला हवी याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
दिवसातून दोन किंवा अधिक पाकिटे सिगारेट ओढणाऱ्यांना फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याची शक्यता २० पटीने वाढते. विडी-सिगारेट ओढणे बंद केल्यावर संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. सिगारेट व पाईप ओढणाऱ्यांमध्ये फुफ्फुसांचा कॅन्सर इतर आजारांच्या तुलनेत जरा कमी होत असला तरी विडी-सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये त्याचे प्रमाण हे निश्चितच जास्त असते.धूम्रपानाचे दुष्परिणाम वाढून त्याची परिणती फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये होण्यासाठी मद्यपान कारणीभूत ठरते. शहरी वातावरणातील हवा ही दूषित असते आणि त्यामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. धूम्रपानाच्या सवयीमुळे वातावरणात पसरणारा धूर हा घातक असतो.
एका रिसर्चनुसार औषधांमुळे २% रुग्णांना कॅन्सरचा आजार होतो. विविध प्रकारच्या औषधांमुळे निमंत्रण मिळते, त्याचबरोबर साधी अॅस्प्रीनसारखी औषधं ही मोठ्या आतड्यांच्या कॅन्सरपासून बचाव करतात. अनेकांना अनुवांशिकतेमुळे कॅन्सर होतो. त्यासाठी सुरुवातीपासून म्हणजेच तरूण वयात असतानाच आरोग्याकडे लक्ष देणं, वारंवार रेग्युलर चेकअप करणं गरजेचं आहे.
नेहमी सकारात्मक राहा
नेहमी सकारात्मक राहिल्यानं कोणत्याही प्रकारचा ताण तणाव येत नाही. आपली जबाबदारी, आरोग्य, यांबाबत कोणताही नकारात्मक विचार करू नका. योग्य उपचार घेतल्यास तुम्ही आजारापासून लांब राहू शकता.
चांगली झोप घ्या
रोज ७ ते ८ तास झोपल्यानं निरोगी राहण्यास मदत होते. कारण तुम्ही दिवसभरात वेगवेगळी कामं करत असता. अनेकदा औषधांचे सेवन केलं जातं. अशावेळी पुरेशी झोप झाली नाही तर शारीरिक स्थिती खराब होण्याची शक्यता असते. जर पूर्ण झोप झाली तर उत्साह वाढण्यास मदत होईल.
व्यायाम करा
ब्रिदिंग या व्यायाम प्रकारात तुम्हाला श्वसन यंत्रणेवर लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये रक्त पुरवठा चांगल्या पद्धतीने होईल. सगळ्यात आधी ४ सेकंदापर्यंत श्वास रोखून धरा. जेणेकरून फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचेल. मग ४ सेकंदांनी श्वास सोडून द्या. त्यामुळे शरीराला ऑक्सिजन पुरवठा चांगला होतो.
कार्डीयो व्यायाम केल्याने शरीरातीतून घाम बाहेर पडतो शिवाय हृदयाचे ठोके नियमित होण्यास मदत होते. कार्डियो एक्सरसाईज फुफ्फुसांसाठी देखील फायदेशीर असतं. यात साधेसोपे व्यामाम प्रकार असतात. चालणे, एकाच जागी उभं राहून उड्या मारणे, जंपिंग जॅक, चालणे, सायकलिंगचा यात समावेश असतो. यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
याशिवाय आहारही चांगला घ्यायला हवा जेणेकरून फुफ्फुसांना पोषण मिळेल, मादक पदार्थाचं सेवन करू नका. त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला आजाराचं शिकार व्हायला लागू शकतं. त्यामुळे संतुलित आहार घ्या. व्हिटामीन सी असलेल्या पदार्थाचा आहारात समावेश करा.
हे पण वाचा-
लढ्याला यश! भारतात कोरोनाची 2 सर्वात स्वस्त औषधं आली; एक टॅब्लेट 55 रुपयांना
युद्ध जिंकणार! रशियाकडून कोरोना लसीबाबत गुड न्यूज; लसीकरण पुढच्या महिन्यात सुरू होणार?