Health Tips : धावणं हा सर्वात चांगला व्यायाम मानला जातो. महिला असो वा पुरूष प्रत्येकालाच धावण्याची एक्सरसाइज करणं पसंत असतं. पण यात एक प्रश्न नेहमीच अनेकांना पडतो की, महिलांच्या तुलनेत पुरूष अधिक वेगाने कसे धावू शकतात? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी शरीराची रचना आणि शरीरातील काही घटक समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. याचा ताकदीशी काहीही संबंध नाही. चला जाणून घेऊ याचं कारण....
हार्मोन्स
महिला आणि पुरूषांमध्ये अंतर हे हार्मोन्समुळे असतं. बालपणी मुलांचं आणि मुलींचं शरीर जवळपास एकसारखं असतं. पण किशोरावस्था येतात, दोन्ही शरीरांमध्ये वेगवेगळे बदल होऊ लागतात. पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनची वाढ होऊ लागते. महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण २० टक्के अधिक होते. टेस्टोस्टेरॉन हार्मोन हे सेक्स हार्मोन म्हणूनही ओळखले जातात.
टेस्टोस्टेरॉनचे फायदे
शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोन किशोरावस्थेत तयार व्हायला सुरूवात होते. टेस्टोस्टेरॉनमुळे शरीरात नवीन रक्तपेशी तयार होतात. हाडांना मजबूती आणि मांसपेशीच्या मजबूतीसाठी टेस्टोस्टेरॉन हार्मोन गरजेचे असतात. टेस्टोस्टेरॉनच्या अधिक निर्मितीमुळे पुरूषांमध्ये मांसपेशी आणि हाडे अधिक मजबूत होता आणि महिलांमध्ये ठीक याउलट होतं.
हे सुद्धा एक मुख्य कारण आहे की, महिला पुरूषांच्या तुलनेत कमी वेगाने धावतात. त्यासोबतच महिलांमध्ये एस्ट्रोजन हार्मोनचं प्रमाणही अधिक असतं. ज्यामुळे महिलांच्या शरीरात अधिक फॅट असतं. याकारणानेही त्यांच्या धावण्याच्या गतीमध्ये फरक असतो.
शरीराचा आकार
पुरूष वेगाने धावण्याचं आणखी एक मुख्य कारण म्हणजे त्यांच्या शरीराचा आकारही मानलं जातं. जर तुलनात्मक पद्धतीने बघायचं तर महिलांच्या शरीरात कमी मांसपेशी असतात. ज्या धावण्यासाठी फार गरजेच्या असतात. त्यामुळेही पुरूष धावण्यात पुढे निघून जातात. शरीराच्या आकाराच्या हिशोबाने हृदय आणि फुप्फुसाचा आकारही प्रभाव टाकतो. महिलांची फुप्फुसं छोटी असतात, ते कमी ऑक्सिजन घेऊ शकतात. याचा त्यांच्या गतीवर थेट प्रभाव पडतो.
कोणत्या खेळात महिला पुरूषांच्या पुढे
धावण्याच्या खेळात महिला पुरूषांच्या बरोबरीत नसल्या तरी इतर खेळांमध्ये महिला पुरूषांच्या तुलनेत फार पुढे असतातत. जसे की, ज्या खेळांमध्ये शरीराच्या लवचिकतेची गरज असते, त्यात पुरूषांच्या तुलनेत महिला जास्त चांगल्या असतात. त्यासोबतच स्फूर्तीची गरज असणाऱ्या खेळांमध्येही महिला जास्त ऊर्जावान वाटतात.