​HEALTH : जमिनीवर बसूनच का जेवण करावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2017 11:02 AM2017-02-01T11:02:35+5:302017-02-01T16:37:01+5:30

जमिनीवर बसून जेवण करण्याची परंपरा तशी खूप प्राचीन आहे. जमिनीवर बसून जेवण केल्याने आरोग्याचे अनेक फायदे आहेत. सुदृढ आरोग्यासाठी जमिनीवर बसूनच जेवण करावे. मग नेमके कोणते फायदे आहेत, याबाबत आजच्या सदरातून जाणून घेऊया.

HEALTH: Why do you have to sit on the ground and eat? | ​HEALTH : जमिनीवर बसूनच का जेवण करावे?

​HEALTH : जमिनीवर बसूनच का जेवण करावे?

googlenewsNext
ong>-Ravindra More

सध्या प्रत्येकजण एखाद्यातरी आजाराने त्रस्त आहे, याचे कारण म्हणजे धकाधकीची जीवनशैली. मनुष्याचे जीवनमान झपाट्याने बदलत असून त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम होताना दिसत आहेत. या बदलात जेवण करण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. त्यामुळे शरीराच्या अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. जमिनीवर बसून जेवण करण्याची परंपरा तशी खूप प्राचीन आहे. जमिनीवर बसून जेवण केल्याने आरोग्याचे अनेक फायदे आहेत. सुदृढ आरोग्यासाठी जमिनीवर बसूनच जेवण करावे. मग नेमके कोणते फायदे आहेत, याबाबत आजच्या सदरातून जाणून घेऊया. 

* पचनक्रिया सुधारते 
- जमिनीवर बसून जेवण केल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि जेवण चांगले पचते. विशेष म्हणजे जमिनीवर जेव्हा आपण बसतो, तेव्हा सुखासनात बसलेलो असतो, जी पचनक्रियेत मदत करणारी मुद्रा आहे. जेव्हा आपण जेवणासाठी या मुद्रेत बसतो तेव्हा पोटाशी संबंधित समस्या कमी होतात. जेव्हा आपण खाण्यासाठी पुढे झुकतो तर पोटाच्या मांसपेशी मागे पुढे होत असतात, त्यामुळे त्या सक्रिय होतात. या क्रियेमुळे आपल्या पोटातील अ‍ॅसिड वाढते आणि त्यामुळे जेवण सहज पचते. 

* वजन नियंत्रित राहते
- जमिनीवर बसून जेवण केल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. जेव्हा आपण सुखासनात बसता तेव्हा आपला मेंदू आपोआपच शांत होतो आणि पूर्ण लक्ष जेवणावर केंद्रित होते. तसेच बसून जेवल्याने भरपूर खाल्ल्याबाबत पोट आणि मेंदूला योग्य वेळी जाणीव होते, त्यामुळे प्रमाणापेक्षा अधिक खाण्यापासून आपण सावध होतो. 

* शरीर लवचिक होते
- जमिनीवर बसून जेवल्याने आपले शरीर लवचिक होते. जेव्हा आपण पद्मासनात बसता, तर आपल्या पाठीचा खालचा भाग, पोटाच्या भोवतालचा भाग आणि पोटाच्या मांसपेशीत ताण निर्माण होतो. यामुळे पाचनतंत्र सहज आपले काम करते. शिवाय या स्थितीमुळे पोटाच्या तक्रारी दूर होतात, ज्यामुळे आपण केलेले जेवण चांगले पचते. 

* जेवणावर लक्ष असते
जमिनीवर बसून जेवल्याने आपले लक्ष जेवणावर असते. याशिवाय जेवण करतेवेळी योग्य पयार्यांची निवड करण्याची क्षमता विकसित होते. कारण या मुद्रेत आपले मन खूप शांत आणि आपले शरीर पोषणाला स्वीकारण्यास तयार होते. 

 * संंबंध जोपासले जातात
- एकत्र जमिनीवर बसून जेवण केल्याने कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतात. योग्यवेळी जेव्हा संपूर्ण परिवार एकत्र जेवण करतो तेव्हा आपसातील सामंजस्य वाढते. शिवाय परिवाराशी जोडण्याचा हा एक योग्य आणि चांगला मार्ग आहे. 

* वेळेच्या अगोदर म्हातारपण येणार नाही
- जमिनीवर बसून जेवण केल्याने वेळेच्या अगोदर म्हातारपण येत नाही. कारण या मुद्रेत जेवण केल्याने पाठीचा कणा आणि पाठीशी संबंधित समस्या उद्भवत नाही. सोबतच चुकीच्या पद्धतीने बसणाºयांना होत असलेल्या त्रासापासून सुटका मिळते. 

* वय वाढते
जमिनीवर बसून जेवल्याने वयदेखील वाढते. जेव्हा आपण जमिनीवर पद्मासनात किंवा सुखासनात बसतो आणि कुणाच्याही मदतीने उभे राहतो तेव्हा आपले स्रायू मजबूत होतात. त्यामुळे त्यांची सक्षमता वाढते, कारण या मुद्रेतून उठताना अधिक लवचिकता आणि शारीरिक ताकदीची आवश्यकता असते. 

* सांधेदु:खीवर फायदेशीर 
- पद्मासन आणि सुखासन एक अशी मुद्रा आहे जी आपल्या संपूर्ण शरीराला फायदेशीर ठरते शिवाय लवचिकही बनविते. ही मुद्रा आपल्या पचनक्रियेलाच सुधारत नाही तर आपल्या सांध्यांना कोमल आणि लवचिक बनण्यास मदत करते. 

* मेंदूसाठी फायदेशीर 
जमिनीवर बसून जेवण केल्याने मेंदू मजबूत होण्यास मदत होते. जे लोक सुखासनात बसून जेवण करतात त्यांचा मेंदू तणावरहीत राहण्याची शक्यता जास्त असते, कारण ही मुद्रा मेंदू आणि पेशींना शांत ठेवते. 

* ह्रदयदेखील होते मजबूत
- जेव्हा आपण जमिनीवर बसून जेवण करता त्यावेळी रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली होते. यामुळे ह्रदय सहजतेने पचनक्रियेला मदत करणाऱ्या सर्व भागांपर्यंत रक्त पोहोचवते, मात्र जेव्हा आपण खुर्चीवर बसून जेवण करता तेव्हा रक्ताभिसरण विपरित होते. यात हे रक्ताभिसरण फक्त पायांपर्यंतच होते. हेच जेवण करतेवेळी योग्य नाही.  

Also Read : ​हेल्दी ब्रेकफास्ट हवाय ?
                    : निरोगी जीवनासाठी ब्रेक फास्ट महत्त्वाचा !

Web Title: HEALTH: Why do you have to sit on the ground and eat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.