आरोग्य सांभाळा! श्वास घ्यायला त्रास होतोय? असू शकतो हार्ट अटॅकचा संकेत, 'ही' आहेत लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 02:00 PM2024-02-14T14:00:17+5:302024-02-14T14:08:52+5:30
हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरावर अनेक प्रकारची लक्षणं दिसतात. अनेक वेळा लक्षणं 2-4 तासांच्या दरम्यान दिसतात.
जगभरात वेगाने हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हार्ट अटॅकची लक्षणं आधीच ओळखली तर या आजारामुळे होणारे मृत्यू टाळता येऊ शकतात. हार्ट अटॅक येण्यापूर्वी अनेक वेळा लक्षणं दिसतात पण लोक त्याला किरकोळ समजतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. डॉक्टरांच्या मते, हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरावर अनेक प्रकारची लक्षणं दिसतात. अनेक वेळा लक्षणं 2-4 तासांच्या दरम्यान दिसतात.
श्वास घेण्यास त्रास होणं म्हणजे ऑक्सिजनची कमतरता. अशा स्थितीत व्यक्तीला खूप अस्वस्थ वाटू लागतं. हार्ट अटॅक आल्यानंतर अनेक वेळा श्वास घेण्यास त्रास होतो. हल्ली हृदयाच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. अगदी निरोगी लोकांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण दिसून येत आहे. हार्ट अटॅक येण्यामागची काही कारणं आणि लक्षणं जाणून घेऊया...
हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात कोणती लक्षणं दिसतात?
- छातीत दुखणं आणि अस्वस्थता.
- हार्ट अटॅक येण्यापूर्वी जडपणा आणि वेदना जाणवतात.
- थकवा येतो आणि श्वास घेण्यास त्रास होतो.
- वेदना किंवा अस्वस्थता जी खांदे, हात, पाठ, मान, जबडा, दात किंवा कधीकधी पोटापर्यंत जाते.
- घाम येतो.
- खूप थकवा जाणवतो.
- छातीत जळजळ किंवा अपचन
- अचानक चक्कर येणे
- मळमळ
हार्ट अटॅक येण्यामागचं कारण
कोरोनरी आर्टरी डिजीज हे सर्वात जास्त हार्ट अटॅक येण्यामागचं कारण आहे. यामध्ये एक किंवा अधिक हृदयाच्या धमन्या ब्लॉक होतात. कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे हे होते. याला प्लाक असं देखील म्हटलं जातं. प्लाक धमन्या संकुचित करतं, ज्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो. ब्लड सर्क्युलेशन थांबणं हे हार्ट अटॅकचं मुख्य कारण आहे.