Cholesterol Control Tips: खाण्या-पिण्यावर व्यवस्थित लक्ष न दिल्याने आणि खराब लाइफस्टाईलमुळे आजकाल लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलची समस्या वाढत जात आहे. नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्याने शरीरात व्यवस्थित ब्लड सर्कुलेशन आणि ऑक्सिजनचा सप्लाय होत नाही. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. जर या समस्येकडे आधीपासून लक्ष दिलं तर व्यक्तीचा जीव वाचू शकतो. आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही ही समस्या दूर करू शकता.
सकाळी रिकाम्या पोटी करा या पदार्थांच सेवन
डॉक्टरांनुसार, जर तुम्हाला शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण योग्य ठेवायचं असेल तर रात्री एक चमचा मेथीच्या बिया, 4 बदाम, अर्धा वाटी ओट्स, एक चमचा अळशीच्या बिया, एक चमचा सूर्यफुलाच्या बिया आणि 20 मनुके भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर हे पदार्थ रिकाम्या पोटी खा. असं सांगितलं की, या पदार्थांच्या सेवनामुळे धमण्यांमध्ये जमा झालेलं कोलेस्ट्रॉल हळूहळू वितळू लागतं आणि ब्लड सप्लाय पूर्णपणे व्यवस्थित होतो.
कोलेस्ट्रॉल दूर करतं सूर्यफुलाच्या बिया आणि मनुके
डॉक्टरांनी सांगितलं की, मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, फाइबर, पोटॅशियम, कार्बोहाइड्रेट्स आणि कॅल्शियमसारखे तत्व असतात. जे शरीरातील ट्राइग्लिसराइडचं प्रमाण कमी करतं. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण संतुलित राहतं. सूर्यफुलाच्या बियांमध्ये अॅंटी-इन्फ्लामेट्री गुण असतात. ज्यामुळे शरीर फीट राहतं.
मेथी, अळशी आणि बदामाचे फायदे
अळशीच्या बियांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट आणि ओमेगा-2 फॅटी अॅसिड भरपूर असतं. तेच मेथीमध्ये रायबोफ्लेविन, फोलिक अॅसिड, कॅल्शिअम, कॉपर आणि आयरन जास्त असतं. ज्यामुळे नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होत नाही. बदामामुळेही कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते.