हृदयासाठी धोकादायक आहे हीमोग्लोबिनची कमतरता, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 11:41 AM2024-11-23T11:41:42+5:302024-11-23T11:42:50+5:30

एनीमियामुळे ज्यांना श्वास भरून येण्याची किंवा ज्या लोकांना फॅटी लिव्हर असेल किंवा लिव्हरसंबंधी दुसरा आजार असेल तर त्यांनी हा उपाय करायला हवा.

Homemade juice to increase hemoglobin and blood to beat anemia | हृदयासाठी धोकादायक आहे हीमोग्लोबिनची कमतरता, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय!

हृदयासाठी धोकादायक आहे हीमोग्लोबिनची कमतरता, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय!

रक्त अनेक गोष्टी मिळून तयार होतं, ज्यात लाल रक्तपेशींचाही समावेश असतो. हा रक्ताचा महत्वाचा भाग आहे, जो हीमोग्लोबिन नावाच्या प्रोटीनपासून तयार होतो. शरीरात हीमोग्लोबिनची कमतरता रक्ताच्या कमतरतेमुळे होते. ज्याला एनीमिया म्हटलं जातं. हीमोग्लोबिन कमी झाल्याने रक्ता ऑक्सिजनची कमतरता होते.

आयुर्वेदिक डॉक्टर निशांत गुप्ता यांनी हीमोग्लोबिन वाढवण्यासाठी एक उपाय सांगितला आहे. त्याच्यानुसार, १५ ते २० दिवसात लेव्हल वाढते. हा उपाय अशा लोकांसाठी जास्त फायदेशीर ठरेल, ज्यांना रक्ताच्या कमतरतेमुळे अधिक कमजोरी जाणवते. एनीमियामुळे ज्यांना श्वास भरून येण्याची किंवा ज्या लोकांना फॅटी लिव्हर असेल किंवा लिव्हरसंबंधी दुसरा आजार असेल तर त्यांनी हा उपाय करायला हवा.

हृदयरोगाचा धोका

एनीमियामुळे एरिदमिया नावाचा हृदयरोग होऊ शकतो. ज्यात हृदयाचे ठोके असामान्य होतात. एनीमियामुळे रक्तात कमी झालेली ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी हृदयाला ब्लड जास्त पंप करावं लागतं. ज्यामुळे हृदयाची साइज वाढणं किंवा हार्ट फेलिअर होऊ शकतो.

चिंचेचं पाणी

डॉक्टरांनी हीमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपाय सांगितला आहे. त्यात चिंचेचं पाणीही मिक्स करावं लागतं. हे तयार करण्यासाठी चिंच अर्धा तास पाण्यात टाकून ठेवा. जेव्हा ती मुलायम होईल तेव्हा चोळून पाण्यात मिक्स करा.

हीमोग्लोबिन वाढवणारा ज्यूस

२ ते ३ चमचे डाळिंबाचे दाणे घ्या. त्यासोबत २ ते ३ चमचे बिटाचे तुकडे आणि २ ते ३ चमचे गाजराचे तुकडे टाका. यांना मिक्स करून ज्यूस तयार करा. या ज्यूसमध्ये एक चमचा चिंचेचं पाणी टाका. तुमचं हीमोग्लोबिन वाढवणारा उपाय तयार आहे. डॉक्टरांनुसार, १५ ते २० दिवस हा उपाय करून हीमोग्लोबिन वाढणार.

हीमोग्लोबिन कमी होण्याची लक्षणं

थकवा आणि कमजोरी जाणवणे

श्वास भरून येणे

शरीर पिवळं पडणे

असामान्य धडधड

चक्कर येणे

डोकेदुखी

छातीत वेदना

हात-पाय थंड पणे

डोकेदुखी
 

Web Title: Homemade juice to increase hemoglobin and blood to beat anemia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.