किडनी ट्रान्सप्लांटपासून वाचण्यासाठी रोज घ्या एक कप कॉफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 10:13 AM2019-12-17T10:13:15+5:302019-12-17T12:53:45+5:30
दररोजचे जीवन जगत असताना आपण चहा कॉफी अनेकदा घेतो. कॉफी प्यायल्यास तरतरी येते. तसंच काम करण्याचा उत्साह अधिक वाढतो.
दररोजचे जीवन जगत असताना आपण चहा, कॉफी अनेकदा घेतो. कॉफी प्यायल्यास तरतरी येते. तसंच काम करण्याचा उत्साह अधिक वाढतो. कॉफीचे सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल घडून येतात. चला तर मग जाणून घेऊया दररोज एक कप कॉफी प्यायल्याने तुमचं आरोग्य कसं उत्तम राहील.
जास्तीत जास्त लोकांना कॉफी प्यायला आवडते. पण जर कॉफिचे अतिप्रमाणात सेवन केलं तर आरोग्याला धोका उद्भवू शकतो. तसंच जर कॉफीचं सेवन करत असताना ते योग्य प्रमाणात केलं तर मोठ्या आजारांपासून वाचता येऊ शकतं. कॉफीचे सेवन शरीरासाठी किती फायदेशीर आहे. या विषयावर आधारीत एक रिसर्च समोर आला आहे.
या रिसर्च रिर्पोटनुसार कॉफी प्यायल्याने शरीरातील किडनीचे कार्य सुरळीतरित्या चालते. हा रिसर्च अमेरीकन जर्नल ऑफ किडनी डिसीज यामध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. संशोधकांच्यानुसार क्रॉनिक किडनी डिजीज ही स्थिती ज्यामध्ये किडनी हळूहळू काम पुर्णपणे थांबते. तर योग्यवेळी या समस्येचा उपचार केला नाही तर याचे रूपांतर गंभीर आजारात होते. किडनी फेल होण्याचे चान्सेस अधिक असतात. यावर उपाय म्हणून डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट करावे लागते.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशनच्यानुासार किडनी फेल होण्याचा आजार हा हायपरटेंशनमुळे होतो. जागतीक पातळीवरचा रिपोर्ट पाहता अनेक जीवघेणे आजार होण्याचा धोका क्रोनिक डिसीजमुळे असतो. ग्लोबल बर्डन ऑफ डिजीज (GBD) २०१५ च्या अभ्यासानुसार १.२ मिलियन मृत्यू हे कार्डीयोवॅस्कुलर आजारांमुळे झाले आहेत.
जीमोन वाइड असोसिएशन स्टडी (GWAS) या संस्थेत सहभागी असलेले जे. केनेडी आणि त्यांच्या टीममार्फत कॉफीच्या सेवनाचा किडनीवर होणारा परिणाम याविषयी संशोधन करण्यात आले होते. या संशोधनात सुमारे २ लाख २७ हजार सहाशे ६६ रुग्णांचा समावेश होता. यात असं आढळून आले की दररोज एक कप कॉफी प्यायल्याने क्रोनिक किडनी डिसीज म्हणजेच किडनीशी निगडीत आजार उद्भवण्याचा धोका कमी असतो. कारण कॉफीच्या सेवनाने किडनीचे कार्य सुरळीत चालते. आरोग्यावर सुध्दा सकारात्मक परीणाम घडून येतो.