काळजी वाढली! कोरोना विषाणू कोणत्या भागावर कितीवेळ जिवंत राहू शकतो?;संशोधनातून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 01:46 PM2020-06-10T13:46:45+5:302020-06-10T13:59:09+5:30
CoronaVirus News : कोरोना विषाणू कोणत्या जागेवर सगळ्यात जास्त जीवंत राहू शकतो याबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. या संशोधनात कोरोनाच्या प्रसाराबाबत अभ्यास करण्यात आला होता.
कोरोना विषाणूंच्या संक्रमणाबाबत लोकांमध्ये आता जागृती निर्माण व्हायला सुरूवात झाली आहे. कोरोना रुग्णाच्या शिंकण्या किंवा खोकण्यातून, नाकातून किंवा तोंडातून बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्समार्फत कोरोनाचं संक्रमण पसरत जातं. कोरोना विषाणू कोणत्या जागेवर सगळ्यात जास्त जीवंत राहू शकतो याबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. या संशोधनात कोरोनाच्या प्रसाराबाबत अभ्यास करण्यात आला होता.
जर्नल ऑफ हॉस्पिटल इंफेक्शनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू कोणत्याही जागेवर पाच दिवस जीवंत राहू शकतो. तसंच १० तासांमध्ये मोठ्या क्षेत्रात आपला प्रसार करू शकतो. लंडन युनिव्हर्सिटीच्या या अभ्यासात पाचव्या दिवशी संक्रमणाची कमी तीव्रता दिसून आली.
या अभ्यासात संशोधकांनी ब्रिटनच्या ग्रेट ओरमंड स्ट्रीट रुग्णालयातील बेडवर काही प्रमाणात संक्रमण पसरवलं होतं. १० तासांनंतर संपूर्ण परिसराचे परिक्षण करण्यात आले. संक्रमण खोलीच्या सगळ्या कोपऱ्यात पसरलं होतं. संशोधकांनी या प्रयोगादरम्यान रुग्णांच्या श्वासांमधून घेतलेले विषाणूंचे नमुने आणि माणसांसाठी धोकादायक नसणारे पण झाडांना संक्रमित करणारे विषाणूंचे नमुने कुत्रिमरित्या एकत्र केले होते. मग या ड्रॉपलेट्सना पाण्याच्या थेंबासह एकत्र करून रुग्णालयातील बेडवर शिंपडण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातील ५० टक्के नमुन्यांवर व्हायरसचं संक्रमण दिसून आलं.
संशोधकांनी पाच दिवसात वार्डमधील ४४ ठिकाणांचे शेकडो नमुने एकत्र केले. बेड रेलिंगसह खुर्चा, वेटिंग रुम्स, हॅण्डल, पुस्तकं, लहान मुलांची खेळणी यांवर विषाणूंचा प्रसार झाला होता, असं या संशोधनातून दिसून आलं. संक्रमण ४१ टक्क्यांनी वाढून मोठ्या परिसरात पसरलं होतं. रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण यांच्यामार्फत व्हायरसच्या प्रसाराचा वेग वाढत गेला. एकून ८६ टक्के वस्तूंवर संक्रमण दिसून आलं. पाच दिवसांननंतर संक्रमणाचा वेग कमी दिसून आला.
या संशोधनातील प्रमुख तज्ज्ञ डॉ. लीना सिरिक यांनी माध्यामांना दिलेल्या माहितीनुसार, या संशोधनातून कोणत्याही परिसरातून विषाणूचं संक्रमण कितपत पसरू शकतं याबाबत माहिती मिळवता आली आहे. फक्त व्यक्तीच्या खोकण्या किंवा शिंकण्यातून नाही तर एखाद्या वस्तूला हात लावल्यानंतरही कोरोनाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे तोंडाला सतत स्पर्श करू नये. जास्तीत जास्त स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करावा.
'अशा' पद्धतीने झोपल्यास कोरोनाचा विषाणूंचा टळेल धोका; हृदय रोग तज्ज्ञांचा प्रभावी सल्ला
भारताने शोधले कोरोनाचे उपचार; 'या' औषधांनी बरे होत आहेत रुग्ण, आईसीएमआरची परवानगी