एका दिवसात किती ग्लास गरम पाणी पिणं सुरक्षित? जाणून घ्या प्रमाण!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 11:41 AM2024-11-22T11:41:52+5:302024-11-22T11:42:33+5:30

Hot Water Side Effects: प्रमाणापेक्षा जास्त गरम पाणी पिणं आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. त्यामुळे याचं सेवन कमी प्रमाणातच करावं.

How much hot water should drink in a day? | एका दिवसात किती ग्लास गरम पाणी पिणं सुरक्षित? जाणून घ्या प्रमाण!

एका दिवसात किती ग्लास गरम पाणी पिणं सुरक्षित? जाणून घ्या प्रमाण!

Hot Water Side Effects: बरेच लोक वजन कमी करण्यासाठी किंवा फीट राहण्यासाठी, पोट साफ करण्यासाठी नेहमीच गरम पाण्याचं सेवन करतात. असं मानलं जातं की, गरम पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण अनेकांना गरम पाणी पिण्याचे नियम माहीत नसतात. तुम्हाला माहीत आहे का की, दिवसातून किती गरम पाणी प्यावं? क्वचितच कुणाला माहीत असेल. पण प्रमाणापेक्षा जास्त गरम पाणी पिणं आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. त्यामुळे याचं सेवन कमी प्रमाणातच करावं. अशात जाणून घेऊ जास्त गरम पाणी पिण्याचे नुकसान आणि एका दिवसात किती गरम पाणी प्यावे.

एका दिवसात कोमट पाणी किती प्यावे?

गरम पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं तर असतं, पण याचं सेवन एका प्रमाणात केलं पाहिजे. दिवसातून तीन ग्लासपेक्षा जास्त गरम पाणी पिऊ नये. त्यासोबतच सकाळी रिकाम्या पोटी आणि जेवणाच्या एक तासानंतर कोमट पाणी पिणं फायदेशीर असतं. लक्षात ठेवा की, तुम्हाला कोमट पाणी प्यायचे आहे. जास्त गरम पाणी पिऊ नये.

गरम पाणी पिण्याचे साइड इफेक्ट्स

- जास्त प्रमाणात आणि जास्त गरम पाणी प्यायल्याने अन्ननलिकेत छोटे छोटे फोड येतात.

- जास्त गरम आणि प्रमाणापेक्षा जास्त गरम पाणी प्यायल्याने पाइल्सची समस्याही होऊ शकते.

- त्याशिवाय गरम पाणी प्यायल्याने पोट भरलेलं वाटतं. असं केल्याने तुम्हाला डिहायड्रेशनची समस्याही होऊ शकते. 

- जास्त गरम पाणी प्यायल्याने तुमच्या पचन तंत्रावरही वाईट प्रभाव पडतो.
 

Web Title: How much hot water should drink in a day?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.