How test chemically ripen watermelons : सावधान! तुम्ही बनावट अन् इंजेक्शन देऊन पिकवलेलं कलिंगड विकत घेताय? कसा ओळखाल फरक?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 05:14 PM2021-04-02T17:14:50+5:302021-04-02T17:15:30+5:30
How test chemically ripen watermelons : साधारणपणे इंजेक्शन दिलेले कलिंगड जास्त लाल दिसतात. कापल्यानंतर तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त गोडवा आणि लाल रंग जाणवत असेल तर कलिंगड केमिकल्सयुक्त असू शकतं.
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या फळांचा आहारात समावेश केला जातो. सगळ्यात जास्त खाल्ल जाणारं आणि लोकांचं आवडीचं असणारं कलिंगड बाजारात दिसायला सुरुवात झाली आहे. शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी कलिंगड खाणं फायद्याचं ठरतं. उन्हाळा आला की, आंबे, ताडगोळे आणि कलिंगड खाण्याचा मोह कोणाकडूनही आवरला जात नाही.
काहीही खायचं म्हणलं तर पैसे मोजावे लागताच पण पैसे देऊनही तुम्हाला भेसळयुक्त फळं मिळत असतील तर आरोग्याचं खूप नुकसान होऊ शकतं. कलिंगडात ९२ टक्के पाणी आणि ६ टक्के साखर असते. कलिंगडात फायर्बस असल्यामुळे याचं सेवन उन्हाळ्यात खुप केलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का? अनेकदा उन्हाळ्यात कलिंगड इंजेक्शन देऊन पिकवलं जातं. इंजेक्शन देऊन पिकवलेलं आणि नैसर्गिक कलिंगड यातील फरक ओळखं हे लोकांसाठी कठीण असतं.
अनेकदा कलिंगडाला लाल रंग देण्यासाठी त्यात इंजेक्शन दिलं जातं. लवकर पिकवण्यासाठी ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन टाकलं जातं. अशा केमिकल्सयुक्त कलिंगडाचे सेवन शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला इजेक्शनचा वापर केलेलं कलिंगड कसं ओळखायचं याबाबत सांगणार आहोत.
१) कलिंगड लवकर पिकवण्यासाठी नायट्रोजनचा वापर केला जातो. नायट्रोजन शरीरात गेल्यानंतर आरोग्याचं नुकसान होतं. कलिंगडाचा रंग लाल दिसण्यासाठी त्यात क्रोमेट, मेथनॉल यलो, सुडान रेड या केमिकल्सचा वापर केला जातो. त्यामुळे फुड पॉईजनिंग होण्याची शक्यता असते.
२) अनेकदा कलिंगड कार्बाईडचा वापर करून पिकवलं जातं. जे लिव्हर आणि किडनीसाठी धोकादायक ठरू शकतं. कॅन्सर, लैंगिक क्षमता कमी होणं. यांसारखे आजार उद्भवतात. तसंच पचनक्रिया खराब होऊन पोटाचे विकार उद्भवतात.
३) अशी करा तपासणी : कलिंगडावर पांढरी किंवा पिवळ्या रंगाची पावडर दिसत असेल तर ती धूळ असल्याचा आभास सुद्धा होऊ शकतो. पण कार्बाइडमुळे कलिंगडावर पावडर असू शकते. त्यामुळे फळं जलद गतीने पिकतात. त्यासाठी कलिंगड कापण्याआधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
४) साधारणपणे इंजेक्शन दिलेले कलिंगड जास्त लाल दिसतात. कापल्यानंतर तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त गोडवा आणि लाल रंग जाणवत असेल तर कलिंगड केमिकल्सयुक्त असू शकतं. इंजेक्शन दिलेल्या कलिंगडाच्या आत एक मोठी भेग किंवा खड्डा असतो. जर तुम्हाला कलिंगड खाताना जीभेला नेहमीपेक्षा वेगळी चव वाटत असेल किंवा औषधांप्रमाणे चव असेल तर असे कलिंगडाचे काप खाऊ नका. त्यामुळे आरोग्याला धोका असू शकतो. वाढत्या गरमीच्या वातावरणात खोकला अन् तापापासून बचाव करतील हे ३ पदार्थ; वाचा एक्सपर्ट्सचा सल्ला
५) यासाठी बाजारातून कलिंगड आणल्यानंतर २ ते ३ दिवस असेच राहू द्या. या दिवसांमध्ये कलिंगड खराब झालं नाही तर ते खाण्यास योग्य आहे. जर या दिवसांमध्ये कलिंगडातून पांढरं पाणी बाहेर येत असेल तर तुम्हाला ओळखता येईल की, कलिंगडावर केमिकल्सचा वापर केला आहे. जर असं झालं नाही तर २ ते ३ दिवसांनंतर तुम्ही कलिंगड कापून खाऊ शकता.पोषक तत्वाचं 'पावरहाऊस' ठरतं बीट; उन्हाळ्यात बीटाच्या सेवनानं शरीराला मिळतील हे ६ फायदे